घरमहाराष्ट्रनाशिकएसटी कर्मचाऱ्यांनी मागितली स्वेच्छामरणाची परवानगी

एसटी कर्मचाऱ्यांनी मागितली स्वेच्छामरणाची परवानगी

Subscribe

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून कर्मचारी तणावपूर्ण परिस्थितीत काम करत आहेत. कर्मचाऱ्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन, तसेच मानसिक त्रासामुळे आम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी मिळावी, अशी मागणी नाशिक येथील एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

विलीनीकरण तसेच वेतनवाढीच्या मुद्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. वेतनवाढीस शासनाने मान्यता देऊनही विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याची भूमिका एसटी कामगार संघटनांनी घेतली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -