२५ सप्टेंबरला इंडियन नॅशनल लोकदलाचा हरियाणात महामोर्चा, शरद पवार आणि नितीश यांच्यासह बडे नेते होणार सहभागी

sharad pawar

फतेहाबाद –इंडियन नॅशनल लोक दल (INLD) 25 सप्टेंबर रोजी हरियाणातील चौधरी देवी लाल यांच्या जयंतीनिमित्त फतेहाबादमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे. INLD तो सन्मान दिवस म्हणून साजरा करते. या जयंतीनिमित्त INLD भाजपविरोधी पक्षांना एका व्यासपीठावर एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी आयएनएलडीने अनेक विरोधी नेत्यांना कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण दिले आहे.

हे नेते येणार रॅलीला –

25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आयएनएलडीच्या मेळाव्यात विरोधी पक्षाचे नेते शरद पवार, नितीश कुमार, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरे, कनिमोळी सहभागी होणार असून, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल यांनीही हरियाणातील आयएनएलडीच्या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. जनता दल युनायटेडचे नेते के.सी. त्यागी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

या विरोधी नेत्यांना मिळाले निमंत्रण –

या सन्मान दिन रॅलीचे आयोजन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पनवार, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव, पंजाबचे माजी मुख्यमंत्री स. प्रकाश सिंह बादल, शरद यादव, केसी त्यागी आणि सुखबीर सिंग बादल यांच्यासह अनेक राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण मिळाले आहे.