घरदेश-विदेशबैसाखीनिमित्त भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने शीख देवस्थानांच्या दर्शनाची भाविकांना संधी

बैसाखीनिमित्त भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने शीख देवस्थानांच्या दर्शनाची भाविकांना संधी

Subscribe

नवी दिल्ली : बैसाखी उत्सवानिमित्त, भारतीय रेल्वेने मंगळवारी शीख धर्माच्या अनेक पवित्र स्थळांसाठी भारत गौरव पर्यटक ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली. 10 दिवसांच्या प्रवासात या विशेष ट्रेनमधून 678 भाविक प्रवास करू शकतील. ही धार्मिक यात्रा लखनऊ येथून 5 एप्रिलला सुरू होईल आणि 15 एप्रिलला संपेल.

- Advertisement -

विविध गुरुद्वारा व्यवस्थापन समित्या, संस्था आणि विविध शीख संघटनांशी सविस्तर सल्लामसलत केल्यानंतर 11 दिवस आणि 10 रात्री अशा या यात्रेचे खास नियोजन करण्यात आले असून त्यात पाच पवित्र तख्तांचा समावेश आहे. श्री केसगढ साहिब गुरुद्वारा आणि आनंदपूर साहिब येथील विरासत-ए-खालसा, किरतपूर साहिब येथील गुरुद्वारा श्री पातलपुरी साहिब, सरहिंद येथील गुरुद्वारा श्री फतेहगढ साहिब, अमृतसर येथील श्री अकाल तख्त साहिब आणि श्री हरमंदिर साहिब, भटिंडा येथील श्री दमदमा साहिब, नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर साहिब, बीदर येथील गुरुद्वारा श्री गुरु नानक झिरा साहिब आणि पाटणा येथील गुरुद्वारा श्री हरमंदरजी साहिब यासारख्या स्थळांना भाविकांना भेट देता येईल.

गुरू कृपा यात्रेअंतर्गत आयआरसीटीसीने उपलब्ध केलेल्या भारत गौरव पर्यटक ट्रेनमध्ये 9 शयनयान, 1 तृतीय वातानुकूलित आणि 1 द्वितीय वातानुकूलित कोचची व्यवस्था आहे. स्टँडर्ड, सुपीरियर आणि कम्फर्ट तीन श्रेणींमध्ये टूर पॅकेजची ऑफर रेल्वेने दिली आहे. प्रवासी लखनऊ, सीतापूर, पिलीभीत आणि बरेली येथून प्रवास सुरू करू शकतात किंवा तिथपर्यंत प्रवास करू शकतात. 19 हजार 999 रुपये प्रति व्यक्तीपासून टूर पॅकेज उपलब्ध आहे. एर्गोनॉमिकली डिझाइन केलेल्या खास डब्यांमध्ये आरामदायी रेल्वे प्रवास, संपूर्ण ऑन-बोर्ड आणि ऑफ-बोर्ड जेवण, दर्जेदार हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था, प्रेक्षणीय स्थळांसह संपूर्ण रस्त्याने जाण्याच्या खर्चासह समावेश असेल. टूर एस्कॉर्ट्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, ऑन-बोर्ड सिक्युरिटी आणि हाऊसकीपिंग या सेवाही उपलब्ध असतील. महत्त्वाच्या गुरुद्वारांमध्ये तसेच प्रवासादरम्यान लंगरमध्ये भाग घेण्याचा पर्यायही उपलब्ध असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -