घरदेश-विदेशपुन्हा एकदा गूगलनं डूडल बनवून केले मतदानाचं आवाहन

पुन्हा एकदा गूगलनं डूडल बनवून केले मतदानाचं आवाहन

Subscribe

भारताच्या लोकसभा निवडणुकांची दखल घेत गुगलनेही भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान देशातील १२ राज्यातील ९५ जागांवर होणार आहे. सात टप्प्यात होणारे मतदान ११ , १८, २३, २९ एप्रिल तसेच ६, १२, १९ मे रोजी पार पडणार आहे. सर्च इंजिन गूगलने पुन्हा एकदा भारतीयांना मतदानाची आठवण करून देण्याकरिता खास डूडल साकारलेले दिसत आहे.

मतदान कर्तव्यच नाही तर अधिकार

हे डूडल तयार करून नागरिकांना एक प्रकारे मतदान करण्याचे आवाहन करत मतदान करणे हे आपले कर्तव्यच नाही तर अधिकार देखील आहे. त्यामुळे मतदानाचा हक्क नक्की बजावा. याच पार्श्वभूमीवर भारताच्या लोकसभा निवडणुकांची दखल घेत गुगलनेही भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

- Advertisement -

मतदार राजाला मतदानाचे आवाहन

नेहमीच गुगल त्या त्या दिवसाच महत्त्व ओळखून आपलं डुडल तयार करत असतो. यावेळीही भारतातील लोकसभा निवडणूकीचे महत्त्व लक्षात घेऊन मतदार राजाला मतदानाचे आवाहन केलं आहे. गुगलने मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाहीला आपल्या डुडलमध्ये स्थान दिलं आहे. यासोबतच गुगलकडून लोकांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं. त्याचप्रमाणे तुम्ही कशाप्रकारे मतदान करु शकता याबाबतची संपूर्ण प्रक्रियाही सांगण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -