घरताज्या घडामोडीIRCTC ALERT: आज रात्री साडेतीन तासांसाठी बंद राहणार ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवा,...

IRCTC ALERT: आज रात्री साडेतीन तासांसाठी बंद राहणार ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवा, ‘या’ सेवांवर होणार परिणाम

Subscribe

रेल्वे प्रवासी आज रात्री साडेतीन तासांसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकणार नाहीयेत. भारतीय रेल्वेने तांत्रिक देखभालीसाठी प्रवासी आरक्षण प्रणाली तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय ऑनलाईन बुक केलेल्या रेल्वेच्या विविध सेवांवरही या काळात परिणाम होणार आहे. त्यामुळे तिकिट बुकिंग करू पाहणाऱ्या इच्छुकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.

प्रवासी आरक्षण प्रणाली बंद असल्यामुळे पूर्व रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे, पूर्व तटीय रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, उत्तर पूर्व सीमावर्ती भागातील रेल्वे बुकिंगसह रेल्वे स्थानकांवर तिकीट काउंटरवरून होणाऱ्या बुकिंगवरही याचा परिणाम होणार आहे. रात्री १२ नंतर सुरू होणाऱ्या गाड्यांचे तक्तेही वेळेआधी तयार केले जाणार आहेत.

- Advertisement -

रात्री ११.४५ ते २.३० वाजेपर्यंत सेवा बंद राहणार

रेल्वे अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्री ११.४५ वाजेपासून कोलकाता येथील रेल्वे डेटा सेंटरमध्ये देखभालीचे काम केले जाणार आहे. तसेच हे काम दुपारी अडीच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या काळात रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे.

यादरम्यान रेल्वे प्रवासी तिकीट काऊंटरवरूनही बुकिंग करू शकणार नाहीयेत. देखभालीच्या कामामुळे रेल्वे प्रवाशांना ऑनलाईन चौकशी, रिटायरिंग रूम सर्व्हिसचे बुकिंग करता येणार नाहीये. तसेच ट्रेनशी संबंधित माहिती कॉल सेंटर आणि दूरध्वनी क्रमांक-१३९ द्वारे देखील उपलब्ध होणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा : काल हनुवटीला लागलं होतं अन् आज गुळगुळीत, विनायक राऊतांचा सोमय्यांना चिमटा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -