घरताज्या घडामोडीकाल हनुवटीला लागलं होतं अन् आज गुळगुळीत, विनायक राऊतांचा सोमय्यांना चिमटा

काल हनुवटीला लागलं होतं अन् आज गुळगुळीत, विनायक राऊतांचा सोमय्यांना चिमटा

Subscribe

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला होता. यावेळी हनुवटीला मार लागल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. या दाव्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सोमय्यांवर टीका केली आहे. काल हनुवटीला लागलं होतं. आज हनुवटी गुळगुळीत आहे, असा चिमटा राऊतांनी सोमय्यांना काढला आहे.

विनायक राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, किरीट सोमय्या राज्यपालांना भेटणार आहेत. त्यांचं दुकान नेहमीच उघड असतं. राज्यातले सरकार अस्थिर करावं आणि राष्ट्रपती राजवट लावावी यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. राजकारण करताना तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहात हे पाप आहे. भाजप हे सर्व करत आहे.

- Advertisement -

भाजपची सत्ता असलेल्या त्रिपुरामध्ये काँग्रेसच्या महिला खासदारावर तुम्ही कशा पद्धतीने अन्याय केलात हे सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रपती राजवट लावायला काय केलंय आम्ही?, १७ बलात्कार युपीमध्ये झाले. हाथरस, उन्नावाच्या घटना घडल्या. पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत जाळून टाकलं. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलानं शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घातली. तिथे राष्ट्रपती राजवट लावली का?, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कुठेही महिलांच्या संदर्भात अवमानकारक वागणूक देणार नाही. यासंदर्भात बोलणं किळसवाणं वाटतं. पोलिसांनी व्हिडिओ शेअर करून सिद्ध केलंय की, त्यांना कशा पद्धतीची वागणूक दिलीय. यावर पळवाट काढण्यासाठी जातीच्या नावाने भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : विचारस्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते उद्योजक..,एलॉन मस्कचं जितेंद्र आव्हाडांनी केलं अभिनंदन


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -