घरCORONA UPDATEलग्न, अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासंबंधी केंद्र सरकारची नवी नियमावली

लग्न, अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासंबंधी केंद्र सरकारची नवी नियमावली

Subscribe

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात आतापर्यंत तरी भारताने चांगली कामगिरी केली आहे. त्यात आता लॉकडाऊनमध्ये आणखी सुधारणा आणण्याचे धोरण सरकारने आखले आहे. त्यानुसार आज केंद्रीय गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत काही मार्गदर्शक तत्वे सांगितली. यापुढे दुकानात एकाच वेळी पाच पेक्षा अधिक लोक थांबून शकणार नाहीत. तर लग्नात ५० आणि अंत्यसंस्काराला २० पेक्षा अधिक लोकांना सहभागी होता येणार नाही. तसेच जे लोक उपस्थित असतील त्यांनी तोंडाला मास्क बांधणे जरुरी आहे. तर सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी आपापसात सुरक्षित अंतर ठेवायचे आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली.

- Advertisement -

तसेच भारताबाहेर अडकलेल्या नागरिकांना आणण्याची प्रक्रिया ७ मे पासून सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतात आल्यानंतर सर्वांना आरोग्य आचारसंहितेचे पालन करावे लागणार आहे. तसेच भारतातील ७० हजार स्थलांतरीत मजूरांना आतापर्यंत त्यांच्या गावी सोडण्यासाठी ६२ विशेष ट्रेन चालविल्या आहेत. मंगळवारी आणखी १३ विशेष ट्रेन धावणार आहेत.

श्रीवास्तव पुढे म्हणाल्या की, कार्यालयात देखील आता कामाची पद्धत बदलावी लागणार आहे. जे कार्यालय सुरु आहेत. त्यांना थर्मल स्कॅनिंग करावी लागणार आहे. कार्यालयातील वरिष्ठांना मास्क आणि सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. शारिरीक अंतर ठेवून काम करण्याची सवय आता लावून घ्यावी लागेल.

- Advertisement -

 

तर आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल म्हणाले की, मागच्या २४ तासात देशात १०२० लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत १२ हजार ७२६ लोकांनी कोरोनाला हरवले आहे. तर देशात सध्या ४६ हजार ४३३ रुग्णसंख्या आहे. मागच्या २४ तासात ३९०० पेक्षाही जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत १ हजार ५६८ लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तर मागच्या २४ तासांत तब्बल १९५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -