Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींची ३ मिनिटांची उपस्थिती, संजय राऊतांसह विरोधक नाराज

सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींची ३ मिनिटांची उपस्थिती, संजय राऊतांसह विरोधक नाराज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटचे ३ मिनिट असताना या बैठकीला हजर राहिले

Related Story

- Advertisement -

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार १९ जुलैपासून सुरु होणार असून एकूण १९ दिवस संसदेचे कामकाज चालणार आहे. संसदेच्या अधिवेशनापुर्वी संसदीय कार्यमंत्र्यांद्वारे सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येते या बैठकीला सर्व विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी उपस्थित राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अवघे ३ मिनिट उपस्थित राहिल्यामुळे विरोधकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे, शिवसेना खासदार संजय राऊत, डेरेक ओब्रायन यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती पार पडलेल्या या बैठकीला ३३ पक्षांनी उपस्थिती लावली असून ४० हून अधिक नेते सहभाही होते. यामध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे, शिवसेना खासदार संजय राऊत, डेरेक ओब्रायन, राजनाथ सिंह, पंतप्रधान मोदी, अमित शाह अशा प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीत संसदीय कामकाजामध्ये मांडण्यात येणाऱ्या विषयांवर चर्चा होणार होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बैठकीला अवघ्या ३ मिनिटांची हजेरी लावली होती. यामुळे विरोधक प्रचंड नाराज झाले असून त्यांनी तशी आपली नाराजी व्यक्त देखील केली आहे.

- Advertisement -

सर्वपक्षीय बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येते. या अधिवेशनात १५ विधेयकं मांडण्यात येतात अधिक महत्त्वाचे विषय आहेत परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटचे ३ मिनिट असताना या बैठकीला हजर राहिले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. विरोधकांच्या आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या भावना पंतप्रधानांनी जाणून घेणं आवश्यक आहे. यामुळे पंतप्रधान यांनी सुरुवातीपासून हजर राहून नेत्यांशी चर्चा करायला हवी होती अशी विरोधकांची अपेक्षा होती.

विरोधकांना ३ विषयांवर संसदेत चर्चा हवी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी नेत्यांना देशातील ३ प्रमुख विषयांवर चर्चा हवी आहे. यामध्ये देशातील कोरोना परिस्थिती, वाढती महागाई आणि इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलन या ३ विषयांवर चर्चा झाली पाहिजे असे विरोधकांचे म्हणणे आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर सर्व विरोधी नेत्यांचीही बैठक पार पडली या बैठकीत संसदेतील कोणत्या विषयांवर चर्चा करण्यात याबाबत रणनिती आखण्यात आली आहे.

- Advertisement -