प्लॅटफॉर्मवर उभा असतानाच ओव्हरहेड वायर पडली; थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

ओव्हर हेड वायरमधून जाणारा वीजेचा प्रवाह जीवघेणा असतो. त्यामुळेच रेल्वेच्या टपावरुन प्रवास न करण्याचे आवाहन रेल्वेकडून वेळोवेळी केले जाते. अशा घटना टाळण्यासाठी जनजागृती केली जाते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही रेल्वे टपावरुन प्रवास करताना जखमी किंवा मृत्यू झाल्याच्या घटना घडतच असतात. मात्र पश्चिम बंगालमध्ये घडलेली ही घटना सर्वांनाच धक्का देणारी आहे.

Tree fallen on overhead wire at mulund station
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायरवर झाड पडले

पश्चिम बंगाल: रेल्वे फलाटावर उभ्या असलेल्या तिकीट तपासनीसच्या (टीसी) अंगावर ओव्हर हेड वायर पडल्याची घटना पश्चिम बंगाल येथे घडली आहे. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. सुदैवाने या घटनेतील जखमी टीसीचे प्राण वाचले आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या महिन्यात ही घटना घडली.

ओव्हर हेड वायरमधून जाणारा वीजेचा प्रवाह जीवघेणा असतो. त्यामुळेच रेल्वेच्या टपावरुन प्रवास न करण्याचे आवाहन रेल्वेकडून वेळोवेळी केले जाते. अशा घटना टाळण्यासाठी जनजागृती केली जाते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही रेल्वे टपावरुन प्रवास करताना जखमी किंवा मृत्यू झाल्याच्या घटना घडतच असतात. मात्र पश्चिम बंगालमध्ये घडलेली ही घटना सर्वांनाच धक्का देणारी आहे.

दोघेजण रेल्वे फलाटावर बोलत उभे होते. त्यावेळी अचानक ओव्हर हेड वायर एकाच्या अंगावर पडली. जखमीला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत जिवीतहानी झाली नाही. जखमी व्यक्तिची प्रकृतीही स्थिर आहे. महत्त्वाचे म्हणजे ७ नोव्हेंबर २०२२ रोजी ही घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना शुक्रवारी सोशल मिडियावर वायरल झाली. त्यामुळे व्हायरल झालेली ही क्लिप नेमकी कुठली आहे व यातील जखमी व्यक्ति नेमकी कोण आहे, याचा शोध नेटकऱ्यांनी घेतला. ही घटना पश्चिम बंगालमधील एका रेल्वे स्थानकावर घडली. यातील जखमी व्यक्ति टीसी असल्याचे स्पष्ट झाले. तसेच पक्ष्यामुळे ओव्हर हेड वायर सैल झाली व टीसीच्या अंगावर पडली, असेही समोर आले.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात मुंबईत एक तरुण ओव्हर हेड वायरला चिकटला होता. त्याचावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. अमन शेख असे या तरुणाचे नाव आहे. तो जोगेश्वरी येथे राहणारा आहे. तो सेल्फी काढण्यासाठी रेल्वेच्या टपावर चढला होता. ओव्हर हेड वायरला तो चिकटला व भाजला.

तसेच पुणे येथेही एक प्रवासी ओव्हर हेड वायरला चिकटला होता. हा प्रवासी गोरखपूर एक्स्प्रेसच्या टपावर चढला होता. तो टपावरुन चालत निघाला होता. त्यावेळी तो ओव्हर हेड वायरला चिकटला व भाजला. त्यानंतर तो फलाटावर कोसळला. पोलिसांनी त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.