घरमुंबईमुंबईकरांनो आरोग्य सांभाळा! श्वसनासंबंधित आजारांमध्ये होतेय वाढ

मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा! श्वसनासंबंधित आजारांमध्ये होतेय वाढ

Subscribe

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रंचड धुळ, धुळ पाहायला मिळतेय. मुंबईत थंडीचं प्रमाण जसं वाढतयं तसं समुद्री वाऱ्यांचा वेगही मंदावला आहे. यामुळे शहरात एकाकी धुक्याचं प्रमाण वाढलं त्यातच प्रदुषणाची पातळीही वाढली आहे. अशा परिस्थिती मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने वाढतेय. मुंबईत हवेचा स्तर 315 इतका नोंदवला गेला, हे प्रमाण मुंबईतील सर्वात खराब गुणवत्तेचे असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मुंबईत सातत्याने घसरत असलेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे प्रदुषण वाढतेय आणि मुंबईकरांना विविध आजारांचा सामना करावा लागतोय.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अनेकांना श्वास घेण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना आता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वाढत्या हवा प्रदुषणामुळे मुंबईकरांना श्वसनासंबंधीत आजार बळावत आहेत. यात घसा खवखवणे, खोकला, सर्दी, ताप, डोकेदुखी अशी लक्षणं दिसत आहे. अशी लक्षण असणाऱ्यांचे प्रमाण 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहे. दिवसा उकाडा आणि रात्री अचानक थंडी अशा वातावरण बदलामुळे हे आजार बळावत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

मुंबईत हवेचा स्तर 315 इतका नोंदवला गेला आहे, तर दिल्लीत हेच प्रमाण 263 वर गेले आहे. या आकड्यांवरूनचं मुंबईची हवा किती प्रदुषित आहे हे स्पष्ट होतेय. यात मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो यासारखी विकासकामंही युद्धपातळीवर सुरू असल्यानं हे प्रदूषण येत्या काळातही कायम राहणार आहे. वाऱ्याचा वेग मंदावल्याने धुलिकण मोठ्याप्रमाणात हवेत तरंगत आहेत. यामुळे मुंबईतील प्रदुषण वाढतेय.

करोना विषाणूने नागरिकांच्या फुफ्फुसांवर सर्वाधिक परिणाम झालेला आहे. त्यामुळे आधीच फुफुसांची प्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे. अशात शहरात थंडीमध्ये हवेत मोठ्या प्रमाणावर धुक्यांचे प्रमाण आढळत आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे मुंबईकरांनी स्वत:च्या आरोग्याची योग्य काळजी घ्या.


हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक होणार पास; हालचालींना वेग

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -