घरदेश-विदेशमहाराष्ट्रातील सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांच्यासह चार जणांना पद्म पुरस्कार घोषित

महाराष्ट्रातील सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांच्यासह चार जणांना पद्म पुरस्कार घोषित

Subscribe

एकुण ११९ जणांना पद्म पुरस्काराची घोषणा

सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात येणाऱ्या पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा आज सोमवारी ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक जीवन, विज्ञान आणि अभियांत्रिकीस, उद्योग, वैद्यकीय क्षेत्र, साहित्य, शिक्षण, क्रीडा, सिव्हिल सर्व्हीस यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. यंदाच्या २०२१ सालासाठी एकुण ११९ जणांची पद्म पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यामध्ये १० परदेशी नागरिकांचा, 16 मरणोत्तर तर एक तृतीयपंथी व्यक्तीला पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून एकुण सहा जणांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील रजनिकांत देविदास श्रॉफ यांना (ट्रेड एण्ड इंडस्ट्री) क्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कला क्षेत्रासाठी परशुराम गंगावणे यांना पद्मश्री जाहीर झाला आहे. नामदेव कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे. तर जसवंतीबेन पोपट यांना ट्रेड आणि इंडस्ट्री क्षेत्रासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे. गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्यासाठीचा पद्मश्री जाहीर झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे.

- Advertisement -

जपानच्या शिंझो आबे यांना पब्लिक अफेअर्स या क्षेत्रात पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यासोबतच अमेरिकेच्या नरींदर सिंह कपानी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. कर्नल काझी सज्जद अली जहीर यांना पब्लिक अफेअर्स क्षेत्रासाठीचा पद्मश्री जाहीर झाला. तर स्पेनच्या फादर वॅल्लेस यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठीचा पद्मश्री जाहीर झाला. ग्रीसच्या निकोलस कझनस यांनाही साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठीचा पद्मश्री जाहीर झाला आहे. अमेरिकेच्या श्रीकांत दातार यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठीचा पद्मश्री जाहीर झाला. तर युकेच्या पीटर ब्रुक यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री जाहीर झाला आहे.

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -