घरताज्या घडामोडीइम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर पाकिस्तानात तणावपूर्ण परिस्थिती

इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर पाकिस्तानात तणावपूर्ण परिस्थिती

Subscribe

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीमध्ये गुरूवारी गोळीबार झाला. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाली असून,एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीमध्ये गुरूवारी गोळीबार झाला. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाली असून,एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच, पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) खासदार फैसल जावेद आणि अन्य 13 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ इम्रान खान यांच्या समर्थकांनी देशभरात निदर्शने सुरू केली आहेत. (pakistan imran khan attack tension in pakistan command can be handed over to the army)

या गोळीबारानंतर संपूर्ण पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानात इम्रान खान यांच्या पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात निदर्शने देत आहेत. या संपूर्ण घटनेनंतर पाकिस्तानातील परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान यांचा मोर्चा पंजाबच्या वजीराबाद भागात पोहोचला होता. त्यावेळी ज्या कंटेनरवर इम्रान खान उभे होते, त्याच कंटेनरजवळ गोळीबार झाला. पीटीआय नेते इम्रान इस्माईल यांनी सांगितले की, माजी पाकिस्तानी पंतप्रधानांच्या दोन्ही पायात तीन गोळ्या लागल्या आहेत, त्या शस्त्रक्रियेने काढण्यात आल्या आहेत.

स्थानिक वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, मी एकटाच हल्ला करण्यासाठी आलो होतो. इम्रान खान यांना मारायचे होते कारण अजानच्या वेळीही डीजे वाजत होता. दुर्दैवाने तो वाचला. दरम्यान, या संदर्भात केलेल्या चौकसीनंतर या हल्लेखोराचे नाव फैसल तर काहींमध्ये जावेद इक्बाल असे सांगितले जात आहे. हल्लेखोराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये हल्लेखोर इम्रान खान यांच्या हत्येबद्दल बोलत आहे. तो म्हणाला की इम्रान देशाची दिशाभूल करत आहे, म्हणूनच त्याला मारायचे होते.

- Advertisement -

दरम्यान, इम्रान खानच्या दोन्ही पायात तीन गोळ्या आहेत, त्या शस्त्रक्रियेने काढण्यात आल्या आहेत. बुलेटचे काही तुकडे अजूनही आहेत. इम्रान खान यांची प्रकृती आता स्थिर आहे.


हेही वाचा – औषधोपचार महागले तरी, एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून मिळतेय बिलांची तुटपूंजी रक्कम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -