घरदेश-विदेशकोरोनामुळे लागले देशभरातील 20 हजार शाळांना कुलूप, शिक्षकसंख्येतही घट

कोरोनामुळे लागले देशभरातील 20 हजार शाळांना कुलूप, शिक्षकसंख्येतही घट

Subscribe

नवी दिल्ली : जवळपास दोन वर्षांपूर्वी कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले. सर्वत्र दैनंदिन जीवनच ठप्प केले. बहुसंख्य लोकांचा मृत्यू झाला. अनेक कंपन्या, कारखाने बंद झाले. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रावरही याचा खूप परिणाम झाल्याचे समोर आले आहे. या काळात जवळपास 20 हजार शाळांना कुलूप लागले असून शिक्षकसंख्येतही 1.95 टक्के घट झाली आहे.

शिक्षण मंत्रालयाने भारतातील शालेय शिक्षणावरील ‘एकात्मिक जिल्हा माहिती यंत्रणा अहवाल (युडीआयएसई+) 2021-22 प्रसिद्ध केला आहे. त्यातही आकडेवारी समोर आली आहे. 2020-21मधील एकूण शाळांची संख्या 15.09 लाख होती. तर, 2021-22 मध्ये ती 14.89 लाख झाली. एकूण शाळांच्या संख्येतील घट ही मुख्यत्वे खासगी आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळा बंद झाल्यामुळे तसेच विविध राज्यांनी शाळांचे गट किंवा समूह केल्यामुळे झाली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे की, केवळ 44.85 टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा आहे, तर सुमारे 34 टक्के शाळांमध्ये इंटरनेट कनेक्शन आहे. केवळ 27 टक्के शाळांमध्ये विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी (CSWN) शौचालये आहेत. त्यापैकी 49.7 टक्के शौचालयांमध्ये आधारासाठी कठडा (रॅम्प आणि क्लाइंबिंग सपोर्ट) तयार करण्यात आला आहे.

एकूण विद्यार्थी वाढले
अहवालानुसार, शालेय शिक्षण क्षेत्रात 2021-22मध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक गटात नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 25.57 कोटी होती. तर, 2020-21मधील 25.38 कोटी विद्यार्थ्यांची नोंदणी होती. म्हणजे, नोंदणीच्या तुलनेत त्यात 19.36 लाख इतकी वाढ झाली आहे. 2020-21 मधील 4.78 कोटींच्या तुलनेत 2021-22 मध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीत 4.82 कोटी इतकी वाढ झाली. तर अनुसूचित जमातीची एकूण नोंदणी 2020-21 मध्ये 2.49 कोटी होती. त्या तुलनेत 2021-22 मध्ये 2.51 कोटी इतकी वाढ झाली. एकूण इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या 2020-21 मध्ये 11.35 कोटी होती, 2021-22 मध्ये त्यात 11.48 कोटी अशी वाढ झाली.

- Advertisement -

विद्यार्थिनींची संख्या वाढली
सन 2021-22मध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंत 25.57 कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. हे 2020-21च्या तुलनेत 19.36 लाख अधिक आहे. 2020-21 मध्ये 25.38 कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातही 2021-22 या कालावधीत 12.29 कोटींपेक्षा जास्त मुलींची नोंदणी झाली असून 2020-21मधील मुलींच्या नोंदणीच्या तुलनेत यात 8.19 लाखांनी वाढ झाली आहे.

शिक्षकसंख्याही घटली
या अहवालानुसार, 2020-21च्या तुलनेत 2021-22मध्ये एकूण शिक्षकांच्या संख्येत 1.95 टक्के घट झाली आहे. 2021-22मध्ये एकूण शिक्षकांची संख्या 95.07 लाख असून त्यात 51% पेक्षा जास्त महिला शिक्षकांचा समावेश आहे. 2020-21मध्ये ती 97.87 लाख होती.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -