घरताज्या घडामोडीइमरान खान यांनी केला 'गिफ्ट घोटाळा', दुसऱ्या देशांनी दिलेले गिफ्ट विकून कमावले...

इमरान खान यांनी केला ‘गिफ्ट घोटाळा’, दुसऱ्या देशांनी दिलेले गिफ्ट विकून कमावले लाखो

Subscribe

पाकिस्तानच्या विरोधी पक्षाने बुधवारी इमरान खान यांच्यावर हा गिफ्ट घोटाळ्याचा आरोप केला आहे

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Pakistan PM Imran khan)   हे नेहमीच चर्चेचा विषय असतात. इमरान खान यांनी दुसऱ्या देशांनी दिलेले गिफ्ट विकून लाखो रुपये कमावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या विरोधी पक्षाने बुधवारी इमरान खान यांच्यावर हा गिफ्ट घोटाळ्याचा आरोप केला आहे ज्यात १० लाख अमेरिकी डॉलर्सच्या महागड्या घडाळ्यांचा समावेश आहे. सांविधानिक पदावर आल्यानंतर राष्ट्र प्रमुखांना नेहमीच इतर देशांकडून अनेक भेटवस्तूंची आदान प्रदान होत असते. या भेटवस्तू डिपॉजिटरी नियमांच्या आधारे देशाची संपत्ती असते मात्र पाकिस्तानमध्ये या वस्तूंची खुली विक्री करण्यात येत आहे. नियमांनुसार राष्ट्र प्रमुख किंवा अधिकारी १० हजार रुपयांहून कमी किंमतीच्या वस्तू आपल्या जवळ ठेवू शकतात.

पीएमएल एनचे उपाध्यक्ष आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरमय नवाज यांनी उर्दू भाषेत ट्विट करत इमरान खान यांच्यावर गिफ्ट घोटाळ्याचा आरोप केला आहे. तोशाखान्यातील भेटवस्तू तुम्ही लुटल्या आहे आणि मदिनासारखे राज्य स्थापन करण्याच्या गोष्टी तुम्ही करता?, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे पाकिस्तानमधील विरोधी पक्ष पीडीएमचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी म्हटले आहे की, इमरान खान यांनी एका प्रिंसकडून मिळालेले महागाचे घड्याळ विकले आहे. देशासाठी ही अत्यंत लज्जास्पद घटना आहे.

सोशल मीडियावर देखील इमरान खान यांना एका देशातील राजकुमाराने दिलेल्या १० लाख अमेरिकी डॉलर्सचे महागडे घड्याळ भेट म्हणून दिले होते मात्र इमरान खान यांच्या एका जवळच्या माणसाने हे घड्याळ १० लाख डॉलर्सना दुबईमध्ये विकले आणि त्याचे पैसे इमरान खान यांना आणून दिले अशा चर्चा सुरू आहेत.

- Advertisement -

इमरान खान यांचे राजकीय विशेष सल्लागार डा शाहबाज गिल यांनी म्हटले होते की, सरकारने इतर राष्ट्र प्रमुखांकडून ज्या इस्लामी देशांशी पाकिस्तानचे चांगले संबंध आहेत त्यांच्याकडून पंतप्रधान इमरान खान यांना मिळालेल्या भेटवस्तूंची गोपनीयता राखली आहे. त्यामुळे इतर देशांशी तुलना करणे योग्य नाही. त्याचप्रमाणे पुढे त्यांनी म्हटले की, इमरान खान त्यांना मिळालेल्या भेटवस्तू तोशाखानात जमा करतात. त्यांना जर ती वस्तू स्वत:कडे ठेवून घ्यायची असल्यास त्यांना एक विशिष्ट रक्कम भरावी लागेल.


हेही वाचा – यंत्रणांचे काम कोणाला घाबरवण्याचे असू नये; पंतप्रधान मोदींचा CVC, CBI ला सल्ला

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -