घरदेश-विदेशमुख्याध्यापकाचे कुकर्म, पाचवीतील मुलीवर महिनाभर बलात्कार

मुख्याध्यापकाचे कुकर्म, पाचवीतील मुलीवर महिनाभर बलात्कार

Subscribe

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपी मुख्याध्यापक आणि शाळेच्या कर्मचाऱ्याला अटक केली. तसेच ही शाळा सील करण्यात आली

एका खासगी शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापक आणि एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पटनामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलीच्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला. हे दोन नराधम या मुलीला हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करुन तिला बदनाम करण्याची धमकी देत होते, असे या मुलीने सांगितले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

अशी आली घटना उघडकीस

११ वर्षीय पीडित मुलगी इयत्ता पाचवीत शिकत असून तिच्यावर महिन्याभरापासून अत्याचार होत होते. तिची अचानक प्रकृती खालावल्यानंतर तिच्या पालकांनी डॉक्टरकडे नेले. तिला वारंवार उलटया होत होत्या. तिचे अंग दुखत होते. तिच्या शरीरातील बदलांमुळे तिची चाचणी करण्यात आली. त्यात ती गरोदर असल्याचे समजले.

- Advertisement -

अभ्यासाच्या बहाण्याने बोलवून अत्याचार

पालकांना झालेला प्रकार कळाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार नराधम मुख्याध्यापक या मुलीला गृहपाठ आणि हस्ताक्षर तपासण्याच्या बहाण्याने केबिनमध्ये बोलवायचा आणि त्याच्या केबिनमधील वॉशरुमध्ये जाऊन तिच्यावर अत्याचार करायचा. या शाळेचा कर्मचारी देखील यात सहभागी होता. हे कृत्य सुरु असताना तो बाहेर पहारा द्यायचा. याशिवाय त्याने त्याच्या फोनमध्ये हे सगळे रेकॉर्ड करुन ठेवले होते. तो ते व्हायरल करण्याची धमकी मुलीला द्यायचा. पोलिसांना अधिक तपासात या मुलीसोबत या मुख्याध्यापकाचा फोटो देखील मुख्याध्यापकाच्या फोनमध्ये सापडला आहे.

शाळेला सील

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपी मुख्याध्यापक आणि शाळेच्या कर्मचाऱ्याला अटक केली. तसेच ही शाळा सील करण्यात आली आहे. या शाळेत आसपासच्या परिसरातील ९० हून अधिक विद्यार्थी शिकत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -