घरदेश-विदेश"सारे जहाँ से अच्छा..." पाकिस्तानी नेत्याचे गाणे व्हायरल

“सारे जहाँ से अच्छा…” पाकिस्तानी नेत्याचे गाणे व्हायरल

Subscribe

पाकिस्तानच्या नेत्यानेच भारताची प्रशंसा केल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांना हा व्हिडिओ आवडल्याचे त्यांनी केलेल्या कमेंन्ट्सवरुन दिसते.

कलम ३७० रद्द केल्याने पाकिस्तानचा तिळपापड होत असताना आता तेथीलच एका नेत्याने गाणे गात भारताचे कौतुक केले आहे. या बाबतचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. पाकिस्तानमधील मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट या पक्षाचा संस्थापक अल्ताफ हुसैन याने ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ हे गाणे गात भारताची प्रशंसा केली आहे. यावेळी कलम ३७० रद्द करणे ही भारताची अंतर्गत बाब असल्याचेसुद्धा या नेत्याने म्हटले आहे. पाकिस्तानच्या नेत्यानेच भारताची प्रशंसा केल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांना हा व्हिडिओ आवडल्याचे त्यांनी केलेल्या कमेंन्ट्सवरुन दिसते.

- Advertisement -

काय म्हणाले अल्ताफ हुसैन?

कलम ३७० रद्द करणे ही पूर्णपणे भारताची अंतर्गत बाब होती. भारतीयांच्या मोठ्या पाठींब्यामुळेच भारत सरकारने हा निर्णय घेतला. ते पुढे म्हणाले की, “जम्मू आणि काश्मिरला स्वतंत्र करण्यासाठी पाकिस्तानने जम्मू आणि काश्मिरमध्ये घुसखोरी केली. यासाठी त्यांनी पाकिस्तानी आदिवासी पट्ट्यातील लोकांना प्रशिक्षण देत जम्मू-काश्मीरवर हल्ल्यासाठी त्या लोकांचा वापर केला. यानंतर, जम्मू-काश्मीरच्या महाराजाने मदतीसाठी भारताकडे संपर्क साधला आणि रियासत भारतामध्ये विलीन करण्याची संमती दर्शविली. पाकिस्तानने भारताबरोबर या प्रदेशात चार युद्धे केली पण या चारही लढतींमध्ये त्यांना लज्जास्पद पराभवाचा सामना करावा लागला. यानंतरही पाकिस्तानने भारताविरूद्ध षडयंत्र करणे थांबवले नाही. आणि जिहादींच्या रुपात भारतात घुसखोरी करणे चालूच ठेवले.” अल्ताफ हुसैन पुढे म्हणाले की, “पाकिस्तान काश्मीरच्या जनतेचा गैरवापर करत त्यांना पाकिस्तानचा झेंडा फडकावण्यासाठी तसेच जम्मू आणि काश्मीरला पाकिस्तानचा भाग बनविण्यासाठी त्यासंबंधीच्या घोषणा देण्यासाठी या जनतेचा वापर करतं.”

हेही वाचा – डॉ. मनमोहन सिंह यांच्या भाष्यावर निर्मला सीतारामन यांचे मौन

नेटकऱ्यांनी घेतली व्हिडिओची दखल

दरम्यान पाकिस्तानी नेत्याच्या या व्हायरल व्हिडिओची नेटकऱ्यांनी दखल घेत त्यावर पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. यावेळी आता भारताचे राष्ट्रगीत पुढे कोण गाणार? असा प्रश्न उपस्थित करत एका नेटकऱ्याने त्यापुढे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना राष्ट्रगीत गाण्याचे सुचवले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने करमणूक करणाऱ्यांमध्ये पाकिस्तान आघाडीवर असल्याचे म्हणत हसू येत नाही तरी हसतो असे म्हटले आहे. एवढेच नाही तर रॉचा एजन्ट सापडला, असेसुद्धा नेटकऱ्यांनी म्हटले आहे. यापुढेही ही इम्रान खान यांची मोठी हार असून सत्य नेहमीच कडवट असल्याचे मतही नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -