घरदेश-विदेशपाकिस्तानात इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक संकट; IMF कडून 14 वेळा घेतलेल्या कर्जाची...

पाकिस्तानात इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक संकट; IMF कडून 14 वेळा घेतलेल्या कर्जाची अद्याप परतफेड नाही

Subscribe

पाकिस्तानात आजवरच्या इतिसाहातील सर्वात वाईट आर्थिक संकटांचा सामना नागरिकांना करावा लागतोय. कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या या पाकिस्तानात दिवसेंदिवस गरीबी इतकी वाढतेय की नागरिकांना दोन वेळचं अन्न मिळणं कठीण झालं आहे. तर देशातला इंधन साठाही संपण्याची भीती आहे. अशा परिस्थितीतून पाकिस्तान सावरणं अशक्य असल्याचं मानलं जातं आहे. तज्ज्ञांच्या मते, 1947 मध्ये स्थापनेनंतरचं हे सर्वाच मोठं आर्थिक संकट आहे. दरम्यान पाकिस्तानने या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून 14 वेळा कर्ज घेतलं परंतु एकदाही ते कर्ज फेडू शकले नाही, अशी माहिती समोर येत आहे. कर्ज देण्यापूर्वी IMF च्या शिष्टमंडळाने भेट घेत पाकिस्तानच्या आर्थिक व्यवस्थेच्या मूल्यांकन केलं आहे.

मात्र आता पाकिस्तान सरकारच्या क्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. देशाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. शासनाचे सर्व विभाग तोट्यात जात असून कोणताही दिलासा मिळत नसल्याचं दिसतयं. तर राजकीय संकटही गडद झालं आहे. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडी चिंतेत आहे की, हे आर्थिक संकट सोडवायचं कसं? यामुळे आर्थिक उपाययोजनांच्या अंमलबजावणीस विलंब होतआहे. देशात बेरोजगारी आणि महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधन आणि वीज संकटामुळे सर्वसामान्यांच्या जनजीवनावर परिणाम होत आहे.

- Advertisement -

IMF कडून पुन्हा कर्ज मिळण्याची आशा

पाकिस्तानला विदेशी बाजारातून काही गोष्टी आता खरेदी करणही शक्य नाही. त्याचा परकीय चलनाचा साठा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आता पाकिस्तान पुन्हा आयएमएफकडून कर्ज मिळेल या आशेवर आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले की, सत्ताधारी पीडीएम आघाडी देशासाठी आपली ‘राजकीय कारकीर्द’ बलिदान देण्यास तयार आहे. पाकिस्तानातील व्यावसायिकांनीही पाकिस्तान सरकारला अल्टिमेटम दिला आहे. डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे मरकाझी तंजीम ताजिरान (व्यापारी सेंट्रल असोसिएशन) यांनी सांगितले की, आयएमएफच्या विनंतीनुसार नवीन कर लागू केल्यास ते 13 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू करतील.


दिल्ली दारू घोटाळ्यात आणखी एकाला ईडीकडून अटक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -