घरताज्या घडामोडीअजब! नवरदेव म्हणतो...मला हवी १०० किलो वजनाची नवरी

अजब! नवरदेव म्हणतो…मला हवी १०० किलो वजनाची नवरी

Subscribe

एका २७ वर्षाच्या तरुणाला आपल्या होणाऱ्या पत्नीचे वजन तब्बल १०० किलो असावे अशी अपेक्षा आहे.

बऱ्याचदा प्रत्येक नवरदेवाच्या आपल्या पत्नीविषयी काही अपेक्षा असतात. काहींना आपली होणारी पत्नी सुंदर आणि दिसायला रेखीव हवी असते. मात्र, एका नवरदेवाची वेगळीच अट आहे. त्याला आपली पत्नी दिसायला सुंदर तर हवीच आहे. पण, त्या मुलीचे वजन १०० किलो असायला हवे, अशी त्याची अट आहे. हा नवरदेव पाकिस्तानमधील असून अरबाब खिजर हयात (२७), असे त्याचे नाव आहे. मात्र, त्याला खान बाबा म्हणून ओळखले जाते. आतापर्यंत या खान बाबाने तब्बल ३०० मुली पाहिल्या आहेत, परंतु त्यामधील त्याला एकही पसंत पडली नाही हे विशेष.

- Advertisement -

का हवी १०० किलो वजनाची मुलगी

खान बाबाचे वजन तब्बल ४४४ किलो असून त्याची उंची देखील सहा फूट सहा इंच आहे. तसेच तो दररोज १० हजार किलो कॅलरी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करतो. तसेच नाश्ताला दररोज ३६ अंडी देखील खातो. तसेच त्याला जेवणात चार कोंबड्याचे चिकन आणि ५ लीटर दूध असा आहार लागतो. त्यामुळे त्याच्या पत्नीला चांगले जेवणही बनवता आले पाहिजे, असेही त्याच्या कुटुंबीयांना वाटते.

- Advertisement -

खान बाबा हा खैबर पख्तुनख्वामधील मरदान येथील रहिवासी आहे. तसेच त्याचे जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती होण्याचे स्वप्न आहे. त्याने यासाठी किशोरवयापासून सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे अद्याप त्याला कोणताही आजार नाही. दरम्यान, ट्रॅक्टरला रस्सी बांधून ओढत नेत असतानाचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर अरबाब चर्चेत आला होता. २०१२ मध्ये त्याला WWF चे मेडलही मिळाले असून, गिनीज बुकमध्ये नोंद झाल्याचा दावा अरबाबने केला आहे.

काय म्हणाला खान बाबा?

‘मी विवाह करावा अशी माझ्या वडिलांची इच्छा आहे. शिवाय, त्यांना घरामध्ये नातवंडे पाहण्याची इच्छा आहे. मी आतापर्यंत ३०० मुली पाहिल्या असून मला त्यातली एकही पसंत पडली नाही. कारण त्यांचे वजन कमी होते. त्यामुळे मला हव्या असलेल्या मुलीचे वजन १०० किलो असावे. तसेच नवरीची उंची ६ फूट असावी आणि तिला जेवण देखील उत्तम बनवता आले पाहिजे.


हेही वाचा – टार्गेट पूर्ण न केल्याने कंपनीने दिली ‘अजब’ शिक्षा, व्हिडीओ व्हायरल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -