पाकिस्तानातून आलेले हिंदू भारतातही झाले बेघर; १५० नागरिकांच्या घरावर बुलडोझर

 

नवी दिल्लीः पाकिस्तानातून राजस्थानमध्ये आलेल्या हिंदूंच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. लहान मुलांसह १५० नागरिक बेघर झाले आहेत. त्यांना भर उन्हात रहावे लागत आहे. जैसलमेर येथील जिल्हाधिकारी टीना डाबी यांच्या आदेशाने ही कारवाई झाली आहे. कारवाईमुळे जिल्हाधिकारी डाबी यांच्यावर टीका होत आहे.

जैसलमेर येथे नगर विकास संस्थेचा अमर सागर पंचायतमध्ये भूखंड आहे. या भूखंडावर अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण मंगळवारी हटवण्यात आले. मुळात येथे पाकिस्तानातून आलेले हिंदू राहत होते. जिल्हाधिकारी डाबी यांच्या आदेशाने ही कारवाई होत झाल्याने संताप व्यक्त होत आहे. मात्र पाकिस्तानातून आलेले हिंदू अमर सागर तलावाच्या किनाऱ्याजवळ राहत होते. त्यामुळे तलावातील पाण्याचा प्रवाह थांबला होता. तसेच हा किमती भूखंड आहे. तेथे पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंनी अतिक्रमण केले होते. त्यामुळेचही कारवाई करण्यात आली, असा दावा प्रशासनाने केला आहे. या कारवाईला विरोधही झाला. जेसीबी, टॅक्टर व पोलिसांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

अमर सागर तलावाजवळ अतिक्रमण झाल्याची तक्रार येथील सरपंच यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. हा किमती भूखंड अतिक्रमणामुळे खराब होत आहे. परिणामी येथील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, बलुचिस्तान प्रांतातील लासबेला जिल्ह्यातील कुंड मालीर भागात असलेले प्राचीन हिंगलाज माता मंदिर हे हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र मानले जाते. हे जगातील पाच प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक आहे. हिंदू देवी सतीला समर्पित असलेले हिंगलाज मंदिर हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. या जगप्रसिद्ध मंदिरात वार्षिक हिंगलाज माता महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र कोविड-19 महामारीमुळे दोन वर्ष हा उत्सव साजरा झाला नव्हता. पण आता या उत्सवाला पुन्हा सुरूवात झाली असून १ मे २०२३ पासून या उत्सवाला पाकिस्तान आणि भारतासह इतर देशांतील भाविकांनी हजेरी लावली. त्याचवेळी भारतीय हिंदूंनी या उत्सवात सहभाग नोंदवला.