Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Panipat Voilence : नूहनंतर पानिपमध्ये वातावरण तापले; धार्मिकस्थळात घुसून युवकांची घोषणाबाजी

Panipat Voilence : नूहनंतर पानिपमध्ये वातावरण तापले; धार्मिकस्थळात घुसून युवकांची घोषणाबाजी

Subscribe

हरियाणामधील पानिपतमध्ये 15 ऑगस्ट रोजी काही युवकांनी तिरंगा रॅली काढली होती. या रॅलीदरम्यान काही युवकांनी मस्जिसमोर चांगलाच गदारोळ घातला.

हरियाणा : मागील काही दिवसांपासून ईशान्येकडील मणिपूरमध्ये दंगे भडकत असतानाच नूहमध्येही हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. आता ही आग हरियाणातील पानिपतपर्यंत जाऊन पोहचली असून, 15 ऑगस्ट रोजी काढलेल्या तिरंगा यात्रेत युवकांनी मस्जिदमध्ये घुसून नारेबाजी केल्याचा प्रकार घडला असून, यामुळे सध्या पानिपतमधील वातावरण चांगलेच तापलेले आहे.(Panipat Violence After Noah, the atmosphere in Panip heated up Proclamation of youth by entering the religious place)

हरियाणामधील पानिपतमध्ये 15 ऑगस्ट रोजी काही युवकांनी तिरंगा रॅली काढली होती. या रॅलीदरम्यान काही युवकांनी मस्जिसमोर चांगलाच गदारोळ घातला. यावेळी त्या युवकांनी धार्मिक घोषणाबाजी केल्याचाही आरोप होत असून, तर काही जण लाठ्या-काठ्या घेऊन मस्जितमध्येही घुसल्याचा आरोप केल्या जात आहे. दरम्यान या मस्जिदच्या बाहेर गोंधळ घालण्याचा आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यावर लावण्यात आला आहे. तर ज्या मस्जिद बाहेर हा गोंधळ झाला त्या मस्जिदच्या इमामांनी डीजीपींना पत्र लिहून गोंधळ घालणाऱ्या युवकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

इमाम म्हणाले, कपाळावर तिरंगा लावू

- Advertisement -

या प्रकरणी मस्जितच्या इमामांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, आम्ही भारतवासी आहोत. हा तिरंगा तैय्यब सुरैया यांनी बनविला आहे. तिरंगा ध्वजावर आमचाही बरोबरीचा हक्क आहे. त्यामुळे आम्ही गरज पडल्यास आमच्या कपाळावरसुद्धा तिरंगा बांधू,त्यांच्या या जबाबानंतर डीएसपींनी इमामांना अश्वासित केले की, ज्यांनी हा प्रकार केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करून वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन दिले.

हेही वाचा : Crime : आर्थिक फसवणूक करणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला इंग्लंडमध्ये दोन वर्षाची शिक्षा

आतापर्यंत 142 गुन्हे दाखल

- Advertisement -

हरियाणामधील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 142 गुन्हे दाखल केले असून, 312 लोकांना अटक केली आहे. तर एकट्या गुरूग्रामधील हिंसाप्रकरणी 37 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 70 जणांना अटक तर 93 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर तिकडे नूहमध्ये हिंसेनंतर 700 पेक्षा जास्त अवैध संपत्तीवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा : देशभरातील 100 शहरात 10 हजार नवीन इलेक्ट्रिकल बस धावणार; अनुराग ठाकूरांची माहिती

नूह ते गुरुग्राम असा झाला हिंसेचा प्रवास

हरियाणाच्या मेवात-नूहमध्ये 31 जुलै रोजी बृजमंडळ यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेदरम्यान दगडफेक झाली होती. यानंतर काही क्षणांतच ही हिंसा दोन समुहात झाली. यानंतर नूहमध्ये कार जाळणे, पोलीस स्टेशनवर हल्ला करणे, पोलिसांवर दगडफेक करणे आदी प्रकार घडले होते. नूहनंतर सोहना येथेही दगडफेक आणि गोळीबार झाला होता. त्यानंतर या हिंसेची आग नूहनंतर थेट फरीदाबाद गुरुग्रामपर्यंत येऊन पोहचली आहे.

- Advertisment -