घरदेश-विदेश... म्हणून झाला ऋषभ पंतचा अपघात; नवीन कारण आले समोर

… म्हणून झाला ऋषभ पंतचा अपघात; नवीन कारण आले समोर

Subscribe

ऋषभ पंत नववर्षाच्या निमित्ताने आईला भेटण्यासाठी दिल्ली येथून देहरादूनला जात होता. त्यावेळी गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात घडला. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ १०८ ला फोन करून पंतला रुग्णालयात दाखल केले. कार चालवताना पंतला डुलकी लागल्याने हा अपघात झाला, असा प्राथमिक अंदाच वर्तवण्यात आला.

नवी दिल्लीः वाहन चालवत असताना समोर आलेला खड्डा वाचवताना क्रिकेटपटू ऋषभ पंतचा अपघात झाला, अशी माहिती समोर आली आहे. शुक्रवारी पंतचा अपघात झाला. त्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताबाबत वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात आहेत. अपघाताचे नवीन कारण समोर आल्याने रस्त्यावरील खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनची (डीडीसीए) टीम पंतला भेटण्यासाठी गेली होती. डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांनी यावेळी पंतची चौकशी केली. ही भेट झाल्यानंतर शर्मा यांनी पंतसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. पंत गाडी चालवत असताना समोर खड्डा आला. तो खड्डा वाचविताना अपघात झाला, असे पंतने सांगितले, अशी माहिती शर्मा यांनी दिली.

- Advertisement -

पुढे शर्मा म्हणाले, ऋषभ पंतला सध्या तरी दिल्लीला हलवले जाणार नाही. ऋषभ पंतला लिगामेंटच्या ट्रीटमेंटसाठी लंडनला जावे लागेल. मात्र त्याचा निर्णय बीसीसीआय घेईल. ऋषभ पंतला कुठेही हलवण्याचा निर्णय बीसीसीआयच घेईल. सध्या त्याला एअरलिफ्ट करण्याची गरज नाही.

ऋषभ पंत नववर्षाच्या निमित्ताने आईला भेटण्यासाठी दिल्ली येथून देहरादूनला जात होता. त्यावेळी गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात घडला. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ १०८ ला फोन करून पंतला रुग्णालयात दाखल केले. कार चालवताना पंतला डुलकी लागल्याने हा अपघात झाला, असा प्राथमिक अंदाच वर्तवण्यात आला.

- Advertisement -

अपघातानंतर कारला आग लागल्याने बाहेर पडण्यासाठी पंतला काच फोडावी लागली. कारमध्ये पंत एकटाच होता.  ऋषभच्या कपाळावर दोन ठिकाणी मार लागला आहे. त्याच्या उजव्या गुडघ्याची लिगामेंट तुटली आहे. त्याच्या उजव्या मनगटाला, घोटाला, पायाच्या बोटांना दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीला मोठ्या प्रमाणावर खऱचटले आहे. शरीरावर अनेक जखमा झाल्या असल्या तरी ऋषभची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

डेहराडून येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये पंतवर उपचार सुरू आहेत. पंतचा अपघात गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी दिल्ली आणावे का, याची चाचपणी सुरु होती. त्याला एअर लिफ्ट करावे का, याचाही अंदाज घेण्यात आला होता. तूर्त तरी पंतला दिल्लीत हलवण्याची गरज नाही, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -