सोलापूरच्या बार्शीमध्ये फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू

fire in solapur barshi pangri crackers factory blast in solapur

नव वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकपाठोपाठ आता सोलापूर तालुक्यातील बार्शीमध्येही भीषण स्फोटाची घटना घडली आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ एका फटाक्याच्या फॅक्टरीमध्ये आज भीषण स्फोट झाला, ज्यानंतर आग लागली, या घटनेत जवळपास 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरु असताना अचानक हा स्फोट झाला. यावेळी 20 ते 25 जण गंभीर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेवेळी फॅक्टरीमध्ये जवळपास 40 कर्मचारी काम करत होते अशी प्राथमिक माहिती.

स्थानिकांच्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील शिराळे पांगरी हद्दीत शोभेच्या दारुचा कारखाना आहे. याठिकाणी फटाके, दारुगोळा तयार करण्यात येतात. याठिकाणी आज दुपारी 2.30 च्या सुमारास अचानक हा स्फोट झाला. हा स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, किमान पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत हा आवाज ऐकू आला. या आगीच्या घटनेत 6 ते 7 कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.


मुंबईत दिडशे तळीरामांची झिंग पोलिसांनी उतरवली