घरताज्या घडामोडीभारतात फळांचे सर्वात जास्त उत्पादन : शरद पवार

भारतात फळांचे सर्वात जास्त उत्पादन : शरद पवार

Subscribe

भारत जगात सर्वात जास्त फळांचे उत्पादन करणारा देश असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. देशात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन होते. परदेशातही द्राक्षाची निर्यात होत असल्याचे पवार म्हणाले. इंदापूर तालुक्यातील बोरी गावात शरद पवारांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अनेक देशात गेलो की तेथील बाजरात जातो. तेव्हा मला त्या बाजारात भारताचा शिक्का बघायला मिळतो.

महाराष्ट्रातील काही गावं अशी आहेत की, त्याबद्दल जास्त आत्मयिता आहे. प्रतिकूल परिस्थितीवर तेथील शेतकरी मात करून चांगली शेती करत असल्याचे शरद पवार म्हणाले. १५ वर्षांपूर्वी फळबाग लागवड संबंधित प्रचार हा राष्ट्रीय पातळीवर न्यावा अशी योजना मी आखली. आज जगात सर्वात जास्त फळ उत्पादन करणारा देश भारत असल्याचे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यात पवारांनी काही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतीची पाहणी केली. कळस येथील शेतकरी खर्चेंच्या शेताला शरद पवारांनी भेट दिली. गेली अनेक वर्षे खर्चे हे १०० टनापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. त्यांच्या ऊस शेतीला भेट दिल्यानंतर शरद पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, सध्या देशात मोठ्या प्रमाणावर साखरेचं उत्पादन होतं आहे. भारत साखरेच्या उत्पादनात जगात एक नंबरचा देश असल्याचे शरद पवार म्हणाले.


हेही वाचा : नाशिकच्या जिंदाल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट; अनेक कर्मचारी जखमी

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -