घरताज्या घडामोडीट्रंप यांना हस्तांदोलन करणारा होता करोनाचा रुग्ण

ट्रंप यांना हस्तांदोलन करणारा होता करोनाचा रुग्ण

Subscribe

संबंधीत करोना बाधीत व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जगभरात करोना विषाणूने थैमान घातले आहे. अमेरिकेत देखील करोनामुळे परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. यामुळे अमेरिकेत आणीबाणी लागू केली गेली आहे. दरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. Conservative Political Action Conference आयोजित करण्यात आली होती. या कॉनफरंसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भाषण केले. यावेळी एका चाहत्याने ट्रंप यांना हस्तांदोलन केले. हस्तांदोलन केलेल्या व्यक्तीची जेव्हा चाचणी करण्यात आली त्यावेळी तो करोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे


हेही वाचा – विरारमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

दरम्यान, काही अहवालांमध्ये त्या व्यक्तीने ट्रंप यांना हात मिळवला नसल्याचे म्हटले आहे. संबंधीत करोना बाधीत व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमेरिकेत करोनामुळे १९ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये ८९ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर वॉशिंग्टन राज्यात करोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणुकींसाठीच्या प्रचारसभा सुरु आहेत. मात्र, करोनामुळे प्रचारसभांवर भितीचे सावट आहे. यामुळे आता प्रचारसभांमुळे निर्बंध येण्याची शक्यता आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -