घरदेश-विदेशलॅन्डिंग करताना विमान तुटलं, थोडक्यात बचावला जीव

लॅन्डिंग करताना विमान तुटलं, थोडक्यात बचावला जीव

Subscribe

या अपघातामुळे धावपट्टीवरील वाहतूक जवळपास १० तास बंद असल्यामुळे, एअरपोर्टवरील विमान वाहुतीकवर त्याचा विपरीत परिणाम झाला.

दक्षिण अमेरिकेतील बोलिवियाच्या एका विमानतळावर आज एक मोठा अपघात घडला. मात्र, पायलटच्या सतर्कतेमुळे आणि नशीब बलवत्तर म्हणून या अपघातातून सर्व प्रवासी सुखरुप बचावले. पेरुच्या एका विमान कंपनीचं बोईंग ७३७ विमान बोलिवियाच्या विमानतळावर आपल्या नियमीत वेळी उतरत होतं. मात्र, लँडिंगच्यावेळी अचानक लँडिंग गिअर तुटल्यामुळे विमानाल अपघात झाला. विमान लँड होता होताच धावपट्टीवर घासलं गेलं. मात्र, त्यावेळी विमानाच्या पायलटने सतर्कता दाखवत विमानाचे ब्रेक लावून, ते वेळीच थांबवलं. ज्यामुळे, शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. हे अपघातग्रस्त विमान पेरुच्या कुजकोहून आलं होतं. दरम्यान, हा अपघात धावपट्टीवरच झाल्यामुळे जवळपास १० तास धावपट्टीवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान वेळीच थांबवण्यात आल्यामुळे विमानातील १२२ प्रवासी आणि विमानातील सर्व स्टाफ सुखरुप वाचले.


व्हायरल Video: सुटलेलं विमान पकडण्यासाठी ‘ती’ रनवेवर धावली

धावपट्टीवरील वाहतूक जवळपास १० तास बंद असल्यामुळे, एअरपोर्टवरील विमान वाहुतीकवर त्याचा विपरीत परिणाम झाला. अन्य कंपन्यांच्या नियोजित विमानसेवांवर याचा परिणाम झाल्याने शेकडो प्रवाशांचे अक्षरश: हाल झाले. अपघातग्रस्त विमान धावपट्टीवरुन हटवल्यानंतर पुन्हा एकदा एअरपोर्टवरील विमान वाहतूक सुरळीत सुरु झाली. हा अपघात नेमका कसा झाला? यामध्ये चूक कोणाची असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. तपास अधिकारी या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या कामात लागले आहेत. या अपघातात, कुणालाही हानी पोहचली नाही, ही दिलासादायक बाब असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. याशिवाय पायलटने प्रसंगावधान दाखवलं नसतं तर खूप मोठा अपघात होऊ शकला असता आणि जीवितहानीही मोठ्याप्रमाणावर झाली असती, असंही तपास अधिकारी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -