घरताज्या घडामोडीPetrol Diesel Price: जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर

Petrol Diesel Price: जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर

Subscribe

जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर.

दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्व सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. मात्र, आज पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर ‘जैसे थे’च ठेवले. पेट्रोल आणि डिझेल दरात देशांतर्गत बाजारात आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या बदलत्या दरांमुळे सामान्य माणसांच्या जीवनावर अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची वाढती किंमत सर्वसामान्यांचा चिंतेचा विषय ठरत आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल मार्केट सातत्याने वर जात असल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होतो. मात्र, आज देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही.

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती

दिल्लीत आज पेट्रोल ८६.९५ रुपये आहे. तर डिझेल ७७.१३ रुपये प्रतिलिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल ९३.४४ रुपये तर डिझेल ८३.९९ रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ८८.०१ रुपये तर डिझेल ८०.७१ रुपये प्रतिलिटर असून चेन्नईमध्ये पेट्रोल ८९.३९ रुपये तर डिझेल ८२.३३ रुपये प्रतिलिटर आहे. तर बेंगळुरूमध्ये पेट्रोल ८९.८५ रुपये तर डिझेल ८१.७६ रुपये प्रतिलिटर आहे.

- Advertisement -

६ वाजल्यापासून लागू होतात नवे दर

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल, डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमतही दुप्पट होते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.

नव्या वर्षात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

नवीन वर्षात पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात १२ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. यामध्ये पेट्रोलचे अधिक दर होते. पेट्रोलच्या दरात ३.२४ रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे पेट्रोलचे दर कायम उच्च राहिले.

- Advertisement -

हेही वाचा – देशभरात शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन, दिल्लीला छावणीचे रुप, महाराष्ट्रातही पडसाद


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -