घरदेश-विदेशपेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार? आज पुन्हा झाली वाढ

पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार? आज पुन्हा झाली वाढ

Subscribe

सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. दर कधी कमी होणार असा सवाल जनता करत आहे.

पेट्रोल-डिझेलचा भडका सुरुच आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. सलग सातव्या दिवशी वाढ झाल्यामुळे जनता आणखी त्रस्त झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात १२ पैशांनी वाढ झाली तर डिझेलच्या दरामध्ये २८ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल ८२.४८ रुपये प्रतिलिटर दराने तर डिझेल ७४.९० रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. दिल्लीसोबतच मुंबईमध्ये देखील पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरामध्ये १२ पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरामध्ये २९ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ८७.९४ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे तर डिझेलमध्ये २९ पैशांनी वाढ झाल्यामुळे मुंबईत डिझेल ७८.५१ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे.

- Advertisement -

सणासुधीच्या काळात दरवाढ सुरुच

गेल्या महिनाभर पेट्रोल आणि डिझेलचे दरात सातत्याने वाढ होत होती. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी करण्याचा निर्णय घेतला. तरी देखील पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरु आहे. मागच्या महिन्यात गणेशोत्सव महागाईत गेला. तर आता नवरात्र आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेली दिवाळी देखील महागाईत जाणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनते पुढे पडला आहे. सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.

दर कमी करुन काय फायदा

देशभरातमध्ये इंधन दरवाढीचे सत्र सुरु असल्याने जनता त्रस्त झाली आहे. सरकारने आठवड्याभरापूर्वी दर कमी केले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मागच्या आठवड्यात इंधनाचे दर २.५० रुपयांनी कमी करण्याची घोषणा करत जनतेला दिलासा दिला होता. त्यानंतर अनेक राज्यामध्ये सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. सरकारने दर कमी करण्याचे फक्त नाटक केले. पुन्हा ही दरवाढ सुरु असल्याने दर कमी करुन नेमका काय फायदा असा सवाल संतप्त जनता करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -