Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'या' महिन्यात मिळणार PM Kisanचा पुढील हप्ता; जाणून घ्या PM Modi कधी...

‘या’ महिन्यात मिळणार PM Kisanचा पुढील हप्ता; जाणून घ्या PM Modi कधी करणार घोषणा

Related Story

- Advertisement -

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनाच्या (Pradhan mantri Kisan samman nidhi yojna) लाभार्थ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर पुढील आठवड्यात २००० रुपयांचा हप्ता ट्रान्सफर होईल. ९ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवतील. या दिवशी पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना सकाळी ११ वाजता संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात जर तुम्हाला रजिस्टर करायचे असेल तर http://pmevents.ncog.gov.in या लिंकवर जाऊन करू शकता.

८वा हप्ता केव्हा आला?

मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan) योजना अंतर्गत ८वा हप्ता दिला होता. त्यांनी देशातील ९.५ कोटींहून जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबांना १९ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम ट्रान्सफर केली होती.

असे बना PM Kisan चे सदस्य?

- Advertisement -

जर तुम्हाला PM Kisanचे सदस्य व्हायचे असेल, तर तुम्ही या योजनेसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या नोडल ऑफिसरमार्फत अर्ज करू शकता. याशिवाय या योजनेसाठी तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारेही नोंदणी करू शकता. याशिवाय या योजनेसाठी PM Kisan पोर्टलद्वारेही अर्ज करता येणार आहे.

असा करा अर्ज?

  • पंतप्रधान किसानची वेबसाईट https://pmkisan.gov.in/ यावर जा.
  • ‘Farmers Corner’ नावाचा एक पर्याय दिसेल.
  • यामध्ये ‘New Farmer Registration’ हा पर्याय खाली दिसेल.
  • ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करा.
  • एक नवीन पेज ओपन झाल्यावर, ज्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक आणि Captcha भरावा लागेल.
  • आधार नंबर भरून झाली की काही वैयक्तिक माहिती भरावी लागते.
  • नावावर असलेल्या जागेचा तपशीलदेखील द्यावा लागेल.
  • या प्रक्रियेतून गेल्यानंतर हा फॉर्म सबमिट करा.
- Advertisement -