घरताज्या घडामोडीशेतकऱ्यांसाठी खुशखबर! रविवारी खात्यात जमा होणार प्रत्येकी २ हजार!

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! रविवारी खात्यात जमा होणार प्रत्येकी २ हजार!

Subscribe

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेनुसार रविवारपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी १ लाख कोटी रूपयांच्या अग्रीकल्चर इन्फास्ट्रक्चर फंड सुविधेची सुरूवात करणार आहे. देशातल्या साडे आठ कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रूपये जमा करण्यात येणार आहे. या योजनेतला हा सहवा हफ्ता आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत १० कोटी ३१ लाख ७१ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ७५ हजार कोटी रूपये टाकण्यात आले आहेत. रविवारी (९ ऑगस्ट) शेतकऱ्यांना १७ हजार कोटींचं वाटप करण्यात येणार आहेत. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

- Advertisement -

या योजनेची सुरुवात १ डिसेंबर २०१८ ला झाली होती. लॉकडाऊनच्या काळात योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली  होती.

ऑनलाईन अर्ज करू शकता

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे अर्ज केला असल्यास त्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी PM-KISAN चा हेल्पलाइन नंबर 011-24300606 वर संपर्क करू शकता.

- Advertisement -

-pmkisan.gov.in या वेबसाईटवर तुम्ही पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तपासू शकता

-याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या ‘फार्मर कॉर्नर’ या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही लाभार्थी असाल तर तुमची स्थिती देखील तपासून पाहू शकता.


हे ही वाचा – संतापजनक! ९० वर्षीय कोरोनाबाधित आजीला जंगलात टाकून कुटुंब फरार


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -