घरताज्या घडामोडीGoa Assembly Elections 2022: गोव्यात पुन्हा एकदा कमळ फुलणार - पंतप्रधान नरेंद्र...

Goa Assembly Elections 2022: गोव्यात पुन्हा एकदा कमळ फुलणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील म्हापसा येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी भाषणाची सुरूवात स्थानिक भाषेतून केली. गोव्यातील जनतेने गोल्डन भविष्यासाठी भाजपलाच निवडण्याचं ठरवलं आहे. प्रमोद सावंत यांच्या युवा नेतृत्त्वाखाली भाजपला यश मिळवण्याचा प्रयत्न करेल. १४ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा गोव्यात कमळ फुलवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisement -

जेव्हा कधीही मी गोव्यात येतो तेव्हा मनोहर पर्रिकर यांची कमतरता तीव्रतेनं जाणवते. तुम्हा गोवाकरांना सुद्धा त्यांची कमतरता नेहमीच भासत असेल. मला भाजपचे वरिष्ठ नेते स्वर्गीय फ्रान्सिस डिसुझा यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. यांच सुद्धा मी स्मरण करतो. देव बोडगेश्वराची माझ्यावर कृपा आहे. आज तुम्ही मला ज्या रूपात पाहत आहात त्याची सुरूवात गोव्यातून झाली होती. जून २०१३ मध्ये जेव्हा मी गोव्याच्या धरतीवर होतो. तेव्हा भाजपची कार्यसमिती पार पडली. तेव्हा भाजपनं मला लोकसभा निवडणुकीच्या प्रसार समितीसाठी प्रमुख घोषित केलं होतं. नंतर मला पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं.

गोव्यात पर्रिकरांनी एक सभा आयोजित केली होती. तेव्हा माझ्या तोंडातून एक सहज शब्द निघाला. तो म्हणजे काँग्रेसमुक्त भारत… आज हा शब्द देशाच्या कोट्यवधी नागरिकांचा संकल्प बनला आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisement -

गोव्याची एक वेगळीच संस्कृती आणि ओळख आहे. गोवा सर्वांना बरोबर घेऊन पुढे चालतो. ज्यांना गोव्याच्या संस्कृतीची पर्वा नाहीये. त्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लुटमारी करण्यास सुरूवात केली आहे. तसेच गोव्यात भ्रष्टाचाऱ्याचं एटीएम सुरू होतं. परंतु भाजपने गोव्यात समग्र विकासाचा मुद्दा मांडला. उत्तर गोव्याचा विकास होत असेल तर दक्षिण गोव्याचाही विकास होईल, असं मोदी म्हणाले.


हेही वाचा : Punjab Assembly Election 2022: पंतप्रधान पंजाबमध्ये करणार जंगी प्रचार, तीन रॅलींमधून जनतेला संबोधित करणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -