घरताज्या घडामोडीShaktimaan Movie: आयकॉनिक 'शक्तिमान' आता चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

Shaktimaan Movie: आयकॉनिक ‘शक्तिमान’ आता चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोनी पिक्चर्स अभिनेता मुकेश खन्ना सोबत या प्रोजेक्टवर काम करत आहेत. चित्रपटसृष्टीतील एका मोठा अभिनेता शक्तिमानची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. निर्मात्यांकडून याबाबत कोणताही माहिती देण्यात आलेली नाही. 

Shaktimaan Movie Teaser : नव्वदच्या दशकात टेलिव्हीजनवरील सर्वांची लाडकी मालिका म्हणजे शक्तिमान. या काळातील प्रत्येक लहान मुलाला शक्तिमान माहिती आहे. भारतीय मनोरंजन जगातातील आयकॉनिक व्यक्तीरेखेचे नाव घ्यायचे तर शक्तिमान हे एकच नाव डोळ्यांसमोर येते. हाच आयकॉनिक शक्तिमान आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. हो शक्तिमान आता चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोनी पिक्चर्स अभिनेता मुकेश खन्ना सोबत या प्रोजेक्टवर काम करत आहेत. चित्रपटसृष्टीतील एका मोठा अभिनेता शक्तिमानची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. निर्मात्यांकडून याबाबत कोणताही माहिती देण्यात आलेली नाही.

पाहा शक्तिमानचा टीझर 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony Pictures IN (@sonypicturesin)

- Advertisement -

‘भारतातील आणि जगभरातील अनेक सुपरहिरोंच्या चित्रपटानंतर आता आमच्या देसी सुपरहिरोची वेळ आली आहे. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन शक्तिमानला सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी सज्ज आहे. भारतातील हा देसी सुपरहिरो त्याची जादू पुन्हा निर्माण करणार आहे’, असे म्हणत सोनी पिक्चर्सनी शक्तिमानचा टिझर शेअर केला आहे.

टीव्हीवर मुकेश खन्ना यांनी साकारला होता शक्तिमान

टेलिव्हिजनवरील शक्तिमान ही मालिका फार प्रसिद्ध होती. शक्तिमान भारतातील पहिला सुपरहिरो होता जो लहान मुलांमध्ये प्रचंड प्रसिद्ध होता. लहान मुलांमध्ये शक्तिमानची वेगळी क्रेझ पाहायला मिळायची. अभिनेते मुकेश खन्ना यांनी शक्तिमानची भूमिका बजावली होती. १३ डिसेंबर १९९७ साली ही मालिका टेलिकास्ट झाली होती जी २००५ पर्यंत चालली. ९ वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आजही शक्तिमानचे क्रेझी फॅन्स पाहायला मिळतात.

- Advertisement -

शक्तिमानचे कपडे होते फेमस

शक्तिमान मालिकेतील शक्तिमानचा ड्रेस त्या वेळी लहान मुलांसाठी खास आकर्षणाचा विषय होता. आज जसा स्पायडर मॅनचा ड्रेस लहान मुलांमध्ये प्रसिद्ध आहे त्याची खरी सुरूवात ही शक्तिमानच्या ड्रेसपासून झाली होती. कोणाचाही वाढदिवस असो किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धा लहान मुले शक्तिमानच्याच कपड्यांमध्ये दिसायचे.


हेही वाचा –  Pawankhind Film : इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक! ‘पावनखिंड’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -