Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश पंतप्रधान मोदींकडून सूरतेला मोठं गिफ्ट; 3400 कोटींच्या नव्या प्रकल्पांचे केले उद्घाटन

पंतप्रधान मोदींकडून सूरतेला मोठं गिफ्ट; 3400 कोटींच्या नव्या प्रकल्पांचे केले उद्घाटन

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातमध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी सुरत शहरात मोठी गर्दी पाहयला मिळाली. पंतप्रधान मोदींनी या गुजरात दौऱ्यादरम्यान सूरतला एक मोठं गिफ्ट दिलं आहे. मोदींनी सूरतमध्ये 3400 कोटींच्या नव्या प्रकल्पांचे उद्धाटन केले आहे. तसेच मोदींनी सुरतमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, गुजरातमध्ये सुरू असलेल्या नवरात्रीच्या उत्सवादरम्यान पायाभूत सुविधा, क्रीडा आणि अध्यात्मिक स्थळांची पायाभरणी करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. सुरत हे ‘जनभागीदारी’ आणि एकतेचे उत्तम उदाहरण आहे. सुरतमध्ये संपूर्ण भारतातील लोक राहतात, हा एक छोटासा भारत आहे.

मोदी म्हणाले की, साथीच्या रोगांमुळे आलेल्या पुराच्या समस्यांबद्दल येथे चुकीची माहिती देण्यात आली होती, तो काळ सुरतचे लोक कधीही विसरू शकत नाहीत. मी इथल्या व्यापाऱ्यांना एक गोष्ट सांगितली होती की, जर सुरत शहराचे ब्रँडिंग झाले तर प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक कंपनी आपोआप ब्रँडेड होईल.

नव्या लॉजिस्टिक पॉलिसीचा सुरतला होणार फायदा

- Advertisement -

सार्वजनिक सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, व्यापार आणि व्यवसायात लॉजिस्टिकचे महत्त्व किती महत्त्वाचे आहे. हे सुरतचे लोक चांगलेच ओळखतात. तसेच सुरतला नवीन लॉजिस्टिक पॉलिसीचा खूप फायदा होणार असल्याचे सांगितले. सुरतमध्ये मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसाठी एका मोठ्या योजनेवर काम सुरू झाले आहे.

सुरत डायमंड ट्रेडिंग हब म्हणून होणार विकसित

- Advertisement -

पीएम मोदी म्हणाले की, सूरतचा कापड आणि हिऱ्यांचा व्यवसाय देशभरातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवतो. जेव्हा ‘ड्रीम सिटी’ प्रकल्प पूर्ण होईल, तेव्हा सुरत जगातील सर्वात सुरक्षित आणि सर्वात सोयीस्कर हिरे व्यापार केंद्र म्हणून विकसित होईल.

पीएम मोदी पुढे म्हणाले की, भारतात असे कोणतेही राज्य नसेल ज्याचे लोक सुरतच्या भूमीवर राहत नाहीत. सुरतचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे शहर श्रमाचा आदर करणारे शहर आहे. यादरम्यान पीएम मोदींनी सुरतमध्ये 3,400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली आणि त्यांचे लोकार्पण केले.

पीएम मोदी 29 आणि 30 सप्टेंबर रोजी अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. यादरम्यान ते राज्यातील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी वंदे भारत एक्स्प्रेस आणि अहमदाबाद मेट्रोमधूनही प्रवास करणार आहेत. आपल्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यात ते राज्यात आनंदात आणि उत्साहात साजरे होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या सोहळ्यातही सहभागी होणार आहेत.

गुजरातमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन

पीएम मोदींच्या दोन दिवसीय दौऱ्याची माहिती देताना पीएमओने सांगितले की, पीएम मोदी सुरत, भावनगर, अहमदाबाद आणि अंबाजीच्या कार्यक्रमांमध्ये सुमारे 29,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करणे आणि गतिशीलता वाढवणे हे प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे. भावनगर येथे जगातील पहिल्या सीएनजी टर्मिनलची पायाभरणीही ते करणार आहेत.

भावनगरसारख्या शहरातही सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे विकास प्रकल्प सुरू होणार आहेत. यासोबतच पीएम मोदी ब्रॉडगेज रेल्वे मार्गाची पायाभरणीही करणार आहेत, ज्याच्या पूर्ततेमुळे अंबाजीचा प्रवास सुकर होणार आहे.


मोठ्या गाड्यांमध्ये आता 1 ऑक्टोबरपासून सहा एअरबॅग्स अनिवार्य; नितीन गडकरींची घोषणा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -