घरताज्या घडामोडीकेंद्र सरकार करणार पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा खर्च - पंतप्रधान

केंद्र सरकार करणार पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा खर्च – पंतप्रधान

Subscribe

केंद्र सरकार पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा खर्च करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

देशामध्ये कोरोना लसीकरण मोहिमेला येत्या १६ जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. देशातील कोरोना स्थिती, मोहिमेची पूर्वतयारी अशा सर्व गोष्टींचा आज नरेंद्र मोदी यांनी आढावा घेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकार पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा खर्च करणार असल्याचे देखील मोदी यांनी सांगितले. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक सुरु आहे, यामध्ये त्यांनी याबाबत माहिती दिली.

३० कोटी लोकांना लस देणार

कोविशिल्ड, कोवॅक्सिन या लसींच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिल्यानंतर काही दिवसांतच मोहिम सुरु करण्याचा विचार केंद्राने प्रत्यक्षात आणला आहे. तसेच लसीकरण मोहिमेत सध्या ३० कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. यामध्ये ३ कोटी लोकांना प्राधान्याने लस देण्यात येणार असून यामध्ये डॉक्टर, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, लष्करी जवान, पोलीस आदि कोरोना योद्धांचा समावेश असणार आहे. तर ५० वर्षांपुढील व्यक्ती आणि ज्यांना एकाहून अधिक व्याधी आहेत, अशा ५० वर्षांखालील व्यक्तींनाही ही लस दिली जाणार आहे.

- Advertisement -

कोविड योद्ध्यांना मोफत मिळणार लस

जर सर्व राज्यातील आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्ध्यांची संख्या पाहिली तर ती सुमारे ३ कोटी इतकी आहे. हे निश्चित झालं आहे की, या पहिल्या टप्प्यातील ३ कोटी लोकांच्या लसीकरणासाठी राज्यांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. भारत सरकार हा खर्च करणार आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.


हेही वाचा – नितेश राणे म्हणतात, ‘या’साठी वरुण सरदेसाईंना संरक्षणाची खरी गरज आहे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -