घरदेश-विदेशमास्कशिवाय घराबाहेर पडणं धोकादायक; पंतप्रधानांनी दिला इशारा

मास्कशिवाय घराबाहेर पडणं धोकादायक; पंतप्रधानांनी दिला इशारा

Subscribe

कोरोनाला रोखायचे असेल तर नागरिकांनी नियमांचे पालन करणं आवश्यक आहे.

देशभरात अद्याप कोरोना व्हायरसचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस नव्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातल्या काही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोनाला रोखायचे असेल तर नागरिकांनी नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. नियमांचे पालन केले तर कमी नुकसान होईल. मास्कशिवाय घराबाहेर पडणे सगळ्यात धोकादायक आहे असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

देशातल्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना त्यांनी असेही मत व्यक्त केले की, देश आता पूर्वपदावर येत असून इतर काही देशांच्या तुलनेत भारताची स्थिती नियंत्रणात आहे. मात्र नियमांचे पालन केले नाही तर कोरोनाला रोखता येणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

- Advertisement -

CoronaVirus : जेवढे जास्त लोक मास्क परिधान करतील तेवढ्या लवकर संसर्ग कमी होईल!

देशात गेल्या २४ तासांत १० हजार ६६७ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले असून ३८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील आतापर्यंत एकूण ३ लाख ४३ हजार ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून मात्र दिलासादायक बाब म्हणजे देशात सध्या १ लाख ५३ हजार १७८ अॅक्टिव्ह रुग्ण असले तरी निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तर ९ हजार ९०० रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.

तर जगभरातील कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत आहे. जगभरातील कोरोनाचा आकडा ८१ लाखांहून अधिक झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात ८१ लाख १२ हजार ६११ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ४ लाख ३९ हजार ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ४० लाख ७ हजार ३६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -