घरक्राइमPM नरेंद्र मोदी, CM योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

PM नरेंद्र मोदी, CM योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

मागील अनेक दिवसांपासून देशभरातील राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या प्रकरणी पोलीस तपास करत असूनही धमक्यांचे प्रकार थांबलेले नाही. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. (Pm Narendra Modi And UP Cm Yogi Adityanath Death Threats By E Mail Noida Police Registered Fir)

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस स्टेशन सेक्टर-20 मध्ये एका वृत्तवाहिनीच्या अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. या घटनेची नोंद करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, या प्रकरणी नोएडा पोलिसांना महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे. लवकरच या प्रकरणाचा खुलासा केला जाणार असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही जणांची चौकशी सुरू केल्याचे समजते.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर 16-A येथील एका वाहिनीचे व्यवस्थापक विजय कुमार यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यांनी सांगितले की, ‘त्यांच्या कंपनीचे सीएफओ कुशन चक्रवर्ती यांना अज्ञाताने ई-मेल पाठवला आणि त्यात देशाच्या पंतप्रधानांसह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिली’.

- Advertisement -

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांना प्राथमिक तपासात सायको व्यक्तीने किंवा प्रेमात अपयशी ठरलेल्या व्यक्तीने असा मेल केल्याचा संशय आहे. पोलीस सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत.


हेही वाचा – ठाण्यात ठाकरेंच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळाली, पण घातल्या ‘या’ अटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -