घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ, बद्रीनाथ दौऱ्यावर, 3400 कोटींच्या प्रकल्पांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ, बद्रीनाथ दौऱ्यावर, 3400 कोटींच्या प्रकल्पांची घोषणा

Subscribe

दिवाळीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ऑक्टोबर रोजी म्हणजे आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. ते केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देत पूजा करणार आहेत. या दौऱ्यासाठी सकाळी पंतप्रधान मोदी डेहराडूनच्या जॉली ग्रँट विमानतळावर पोहोचले, ज्याठिकाणी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि राज्यपाल गुरमीत सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर मोदी केदरानाथमध्ये दाखल झाले आहे. मोदींच्या भेटीनिमित्त केदारनाथ मंदिर 10 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी उत्तराखंडमध्ये 3400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील, पंतप्रधान मोदी आठ वर्षांत सहाव्यांदा केदारनाथला भेट देत आहेत. उत्तराखंडमधील केदारनाथ, बद्रीनाथ धामला भेट दिल्यानंतर मोदी 23 ऑक्टोबरला अयोध्येलाही जाणार आहेत.

पीएमओ म्हणजे पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 8.30 वाजता केदारनाथ मंदिरात दाखल झाले आहेत. ज्याठिकाणी ते देवदर्शन घेऊन पूजा करतील, यानंतर 9 वाजता ते केदारनाथ रोपवे प्रकल्पाची पायाभरणी करतील, इकतेच नाही तर मोदी आज आदिगुरु शंकाराचार्यांच्या समाधी स्थळालाही भेट देणार आहेत. तसेच मंदाकिनी आणि सरस्वती नदीच्या काठावरील विकासकामांचा आढावा घेणार आहेत.

- Advertisement -

ज्यानंतर 11.30 वाजता ते बद्रीनाथला पोहचतील जिथेही पूजा करत दर्शन घेतली, पंतप्रधान याठिकाणी रिव्हरफ्रंट विकास कामाच्या प्रगतीचा आढावा घेतील. याशिवाय माना गावात रस्ता आणि रोपवे प्रकल्पाची पायाभरणी करतील. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास पंतप्रधान ‘अरायव्हल प्लाझा’ आणि तलावांच्या विकासकामांचाही आढावा घेतील. या पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमांमुळे उत्तराखंडमधील पर्यटनाला चालना मिळेल आणि यामुळे या भागातील आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळेल, असे पीएमओने म्हटले आहे.तप्रधानांच्या या दौऱ्यात रस्ते रुंदीकरणासाठी 1000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणीही होणार आहे.


बदल्यांचा धडाका कायम, राज्यातील 24 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -