घरमहाराष्ट्रबदल्यांचा धडाका कायम, राज्यातील 24 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

बदल्यांचा धडाका कायम, राज्यातील 24 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Subscribe

मुंबई : राज्यात सुमारे चार महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका कायम ठेवला आहे. गेल्या महिन्याभरात 64 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर राज्य सरकारने गुरुवारी रात्री 24 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. गेल्या काही दिवसांपासून आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या रखडल्या होत्या. मुंबईतील पोलीस उपआयुक्त निलोत्पल यांची गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक म्हणून अनुक्रमे धनंजय कुलकर्णी आणि पवन बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागपूर शहरचे पोलीस उपआयुक्त बसवराज तेली यांची सांगलीचे पोलीस अधीक्षक, गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक शेख समीर अस्लम यांची साताऱ्याचे पोलीस अधीक्षक, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची अहमदनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

नागपूर लोहमार्गचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची जळगाव पोलीस अधीक्षक, जालन्याचे राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक रागसुधा आर. यांची परभणीचे पोलीस अधीक्षक, हिंगोलीचे राज्य राखीव बलाचे समादेशक संदीपसिंह गिल यांची हिंगोलीचे पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

याशिवाय, मुंबईचे पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांची नांदेड पोलीस अधीक्षक, गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमय विनायक मुंडे यांची लातूरचे पोलीस अधीक्षक, नागपूर शहरचे पोलीस उपआयुक्त सारंग आवाड यांची बुलडाणाचे पोलीस अधीक्षक, नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांची यवतमाळचे पोलीस अधीक्षक, नवी मुंबईचे राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक संदीप घुगे यांची अकोलाचे पोलीस अधीक्षक, मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपआयुक्त रवींद्रसिंग परदेशी यांची चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक, नागपूरचे पोलीस उपआयुक्त नुरुल हसन यांची वर्धाचे पोलीस अधीक्षक, लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची गोंदियाचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

नाशिकचे पोलीस उपआयुक्त संजय बारकुंड यांची धुळ्याचे पोलीस आयुक्त, नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्रीकांत परोपकारी यांची ठाणे शहर पोलीस उपआयुक्त, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची औरंगाबादच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदावर बदली करण्यात आली आहे. ठाण्याचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची नागपूरच्या पोलीस केंद्रात प्राचार्य आणि व्हीआयपी सिक्युरीटी, मुंबईचे उपआयुक्त म्हणून पराग मेणेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बदली झाली, पण पदस्थापना नाही
मोहित कुमार गर्ग, राजेंद्र दाभाडे, दीक्षितकुमार गेडाम, अजय कुमार बन्सल, अभिनव देशमुख, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, प्रवीण मुंडे, जयंत मीना, राकेश कलासागर, पी. पी. शेवाळे, अरविंद चावरिया, दिलीप पाटील- भुजबळ, जी. श्रीधर, अरविंद साळवे, प्रशांत होळकर, विश्वा पानसरे, प्रवीण पाटील तसेच निकेश खाटमोडे या अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, त्यांच्या नव्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -