घरताज्या घडामोडीप्राण गमावलेल्या कोरोना योद्धांबद्दल बोलताना मोदींचे डोळे पाणावले

प्राण गमावलेल्या कोरोना योद्धांबद्दल बोलताना मोदींचे डोळे पाणावले

Subscribe

गेल्या वर्षभरात देशात कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले. लाखोहून अधिक लोकांचा कोरोनामुळे जीव गेला. पण आता कोरोना व्हायरसला रोखण्याचे दिवस सुरू झाले आहे. संपूर्ण देशभरात आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहीमचे शुभारंभ करण्यात आले. याचनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आजच्या दिवसांची आतुरतेने वाट पाहत होतो. कोरोना लस आली असून लस विकसित करणाऱ्यांनी खूप कष्ट केले आहेत. त्यांनी कोणत्या सणाची चिंता केली ना घरी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले. अशा दिवसाला राष्ट्रकवि दिनकर म्हणाले होते की, ‘मानव जब जोर लगाता है तो पत्थर पानी बन जाता है.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

या लसीकरण मोहीमेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात कोरोनाशी लढताना प्राण गमावलेल्यांची आठवण काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डोळे पाणावले. ते म्हणाले की, ‘आपले डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अँब्युलन्स ड्रायव्हर, आशा वर्कर, सफाई कर्मचारी, पोलीस आणि दुसरे फ्रंटलाईन वर्कर यांनी मानवता प्रति आपल्या दायित्वाला प्राथमिकता दिली. यामध्ये काहीजण आपल्या कुटुंबियापासून दूर राहिले, कित्येक दिवस ते घरीच गेले नाहीत. तर शेकडो योद्धे असे आहेत, जे घरी कधीच परतले नाहीत. त्यांनी प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवाची आहुती दिली. यामुळे कोरोनाची पहिला डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना देऊन समाज कृतज्ञता व्यक्त करत आहे. इतिहासात अनेक संकट आणि महामारी आली. पण कोरोना सारख्या संकटाची कुणीही कल्पना केली नव्हती. कोरोनाचा अनुभव हा विज्ञानालाही नव्हता आणि समाजालाही.’

- Advertisement -

३० कोटी नागरिकांना दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाणार 

‘लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३ कोटी कोरोना योद्धांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना लस दिली जाईल. तसेच ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त यांनी देखील दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाईल. ३० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले फक्त तीनच देश आहे चीन, अमेरिका आणि भारत,’ असे मोदी म्हणाले.


हेही वाचा – Corona Vaccination: ‘आज आपण एक क्रांतिकारक पाऊल टाकत आहोत’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -