घरट्रेंडिंगपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री करणार शंभरीत प्रवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री करणार शंभरीत प्रवेश

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी शंभरीत प्रवेश करणार आहेत. शनिवार १८ जून रोजी त्यांचा शंभरावा वाढदिवस होणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Hiraben Modi) शंभरीत प्रवेश करणार आहेत. शनिवार १८ जून रोजी त्यांचा शंभरावा वाढदिवस (100th Birthday) होणार आहे. विशेष म्हणजे त्या शताब्दी वर्षात प्रवेश करत असल्या तरी त्या तंदुरूस्त आहेत. अजूनही त्या कोणत्याही आधाराविना चालू शकतात. तसंच स्वतःची सर्व कामं करू शकतात. त्यामळे त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त आतापासूनच शुभेच्छा दिल्या जात आहेत. (pm narendra modi mother will celebrate their 100th birthday)

उद्या १८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तांच्या आईचा वाढदिवस साजरा करणार आहेत. हिराबेन मोदी या सध्या सध्या त्या आपले धाकटे पुत्र पंकज यांच्यासोबत गांधीनगरमध्ये राहतात. आजही त्या घरातलं जेवणच जेवतात. खिचडी, वरण-भात असं साधं जेवण त्यांच्या आहारातअसतात. गोड पदार्थांमध्ये त्यांना लापशी खूप आवडते.

- Advertisement -

नरेंद्र मोदी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आईला भेटायला येतात. तेव्हाही खडीसाखर किंवा लापशीनेच त्यांचे तोंड गोड केले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, हिराबेन यांनी शंभरीत प्रवेश केला असला, तरी त्या अजून निरोगी आहेत. कारण त्या आजारी पडल्याचं फारसं कधी ऐकलं नाही. सर्वसाधारण व्यक्तींपेक्षा त्यांचे आरोग्य खूपच चांगले आहे. त्या नेहमी घरातले साधे जेवणच जेवतात.

सहा महिन्यांपूर्वी गांधीनगरच्या महापालिका निवडणुकीवेळीही मतदान करण्यासाठी हिराबेन स्वतः शाळेपर्यंत गेल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – श्रेय घेणाऱ्या युवराजांनी पालिकेच्या दप्तर दिरंगाईचं उत्तर द्यावे; विद्यार्थ्यांच्या साहित्य वाटपावरून आशिष शेलार आक्रमक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -