घरदेश-विदेशMonsoon Session: पंतप्रधानांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, सोनिया गांधी देखील होत्या उपस्थित

Monsoon Session: पंतप्रधानांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, सोनिया गांधी देखील होत्या उपस्थित

Subscribe

लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात ही बैठक झाली. यावेळी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी देखील या बैठकीला पोहोचले. याशिवाय, तृणमूल काँग्रेस, अकाली दल, वायएसआरसीपी, बिजू जनता दल यासह अनेक विरोधी पक्षांचे नेतेही सभापती ओम बिर्ला यांना भेटण्यासाठी आले होते.

- Advertisement -

काय म्हणाले लोकसभा अध्यक्ष?

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना भविष्यात सभागृहात चर्चा आणि संवादाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. चर्चा आणि संवादातूनच जनतेचे कल्याण होईल असे ते म्हणाले. ओम बिर्ला म्हणाले की, यावेळी काही खासदारांनी ज्या पद्धतीने वागले ते योग्य नव्हते. संसदेचा सन्मान राखला गेला पाहिजे. सर्व पक्षांनी यावर विचार करायला हवा, कारण जर जनता निवडून पाठवते, तर जनतेचे प्रश्न इथे उपस्थित केले पाहिजेत.

राहुल गांधींच्या वक्तव्यावरही दिली प्रतिक्रिया

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर ओम बिर्ला म्हणाले की मी प्रत्येकाला बोलण्याची संधी देतो. काहीही झाले तरी. मी जास्त वेळ सभागृह चालवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येकजण बोलू शकेल, पण सभागृह चालवायला परवानगी नसेल तर ते कसे होईल. ओम बिर्ला म्हणाले की मी खूप प्रयत्न केले की सभागृह सुरळीत चालले पाहिजे, प्रत्येकाने आपला मुद्दा मांडला पाहिजे. राज्यसभेत घडलेल्या घटनेवर ओम बिर्ला म्हणतात की मला दुसऱ्या सभागृहाबद्दल भाष्य करायचे नाही, पण मला एवढे सांगायचे आहे की, जर सभा व्यवस्थित चालली नाही तर कोणताही अध्यक्ष नक्कीच नाराज होईल. खासदारांनी संसदेची प्रतिष्ठा जपली नाही तर कोणीही नाराज होईल.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -