घरदेश-विदेशपोखरणमध्ये सैन्याला भाजीपाला पुरवठा करणारा निघाला ISI दहशतवादी संघटनेचा हेर

पोखरणमध्ये सैन्याला भाजीपाला पुरवठा करणारा निघाला ISI दहशतवादी संघटनेचा हेर

Subscribe

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची हेरगिरी करणाऱ्या एका भाजीविक्रेत्याला अटक केली आहे. हबीब खान असे या व्यक्तीचे नाव असून त्याला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. हबीब खानवर पाकिस्तानी दहशतवादी संघटना आयएसआयला भारताविषयी अनेक गोपनीय माहिती पुरवल्याचे आरोप करण्यात आले आहे. आरोपी हबीब खानच्या अटकेमुळे भारतात पसरलेले पाकिस्तानचे मोठे हेरगिरीचे जाळे उघडकीस आले आहे. चौकशीदरम्यान या आयएसआय हेराने अनेक खुलासे केले आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाकडून या हेगरगिरी करणाऱ्या आरोपीची सतत अधिक सखोल चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हबीब खान या आरोपीला राजस्थानच्या पोखरण या भागातून अटक करण्यात आली. तो राजस्थानच्या बीकानेरचा रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. हबीब खान सामाजिक सामाजिक कार्यात सक्रिय होता. तसेच गेली कित्येक वर्षे तो भाजीपाला पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचे काम करीत होता. सद्यस्थितीत हबीब पोखरणमधील भारतीय सैन्य तळाच्या भागात भाजीपाला पुरवठा करण्याचा ठेका चालवत होता. यामुळे भारतीय सैन्याच्या लष्करी क्षेत्रात हबीबकडून भाजीपाला पुरवठा सुरु होता. यासह हबीब हा पोखरण परिसरातील इंदिरा रसोईतील भाजीपाल्या पुरवठा कराराशीही संबंधीत होता. यामुळे पोखरण भागातील भारतीय सैन्याच्या अनेक हालचालींवर लक्ष ठेवत ही माहिती तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयला पोहवत होता.

- Advertisement -

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने हबीब खानला राजस्थानच्या पोखरण भागातून अटक करत दिल्लीला आणण्यात आले आहे. दिल्लीत आणल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. आयएसआयच्या हेरगिरीच्या आरोपाखाली पकडल्या गेलेल्या या हबीबची चौकशी आता केंद्रीय तपास यंत्रणांनाही करत आहेत. या चौकशीच्या आधारे भारतातील आयएसआयचे मोठे जाळे उघडकीस आणत नष्ट करता येईल, अशी आशा तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -