Instagram वरची मैत्री पडली महागात; तीन मित्रांचा मैत्रिणीवर कारमध्ये बलात्कार

आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात पोलिसांनी चार नराधम लोकांना अटक केली आहे. त्यांच्यावर १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या चौघांनी एका अल्पवयीन मुलीवर कारमध्ये बलात्कार केला. चारही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी घडली

Police have arrested four accused in Assam s Kokrajhar district He raping a 13 year old girl
आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात पोलिसांनी चार नराधम लोकांना अटक केली आहे. त्यांच्यावर १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या चौघांनी एका अल्पवयीन मुलीवर कारमध्ये बलात्कार केला.

आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात पोलिसांनी चार नराधम लोकांना अटक केली आहे. त्यांच्यावर १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या चौघांनी एका अल्पवयीन मुलीवर कारमध्ये बलात्कार केला. चारही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी घडली. ( Police have arrested four accused in Assam s Kokrajhar district He raping a 13 year old girl )

रुबेल रहमान, इम्रान हुसेन, अन्वर हुसैन आणि मोमिनुर रहमान अशी पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत. या सर्वांचे वय १९ ते २४ या दरम्यान असून सर्वजण धुबरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. रुबेल आणि इम्रान हे शालेय विद्यार्थी आहेत. मोमिनूर ड्रायव्हर म्हणून काम करायचा आणि अन्वर काहीही करत नाही.

चौकशीनंतर मुलीने घडला प्रकार सांगितला

पोलिस गस्त घालत होती. दरम्यान, त्यांना या कारचा संशय आला. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने त्यांचा पाठलाग केला. पोलिसांनी चारही मुलं आणि त्या मुलीला पोलिस ठाण्यात नेले. चौकशी केल्यानंतर चारही मुले अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता तिने सांगितले की, या चार मुलांनी तिच्यावर बलात्कार केला आहे.

पोलिसांच्या गस्ती पथकाने पकडलं

वरिष्ठ पोलिस अधिकारी नूर इस्लाम यांनी सांगितले की, पोलिसांचं पथक गस्त घालत होतं. हे रोजचे वेळापत्रक आहे. तिथून एक गाडी गेली. यात काहीतरी गडबड असल्याचा संशय पोलीस पथकाला आला. पाठलाग करून ती कार थांबवण्यात आली. तेव्हा कारमधील मुलांनी बहाणेबाजीला सुरुवात केली . पोलिसांनी कडक भूमिका घेतल्यावर सत्य बाहेर आले. मुलांना तत्काळ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.

( हेही वाचा छोटा पुढारी घनश्याम दराडेचा गौतमी पाटीलला इशारा; म्हणाला, ‘महाराष्ट्राचा बिहार…’ )

इन्स्टाग्रामवर भेटले

याप्रकरणी आणखी एक खुलासा झाला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी चार आरोपींपैकी एक असलेल्या रुबेलला ओळखत होती. दोघांची काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून भेट झाली होती. काही दिवस बोलल्यानंतर चर्चेचं रुपांतर भेटीत झालं. रुबेलने त्याला घराबाहेर कुठेतरी भेटायला बोलावले. रुबेलने त्याच्या मित्रांनाही तिथे बोलावून घेतलं. यानंतर मुलीला कारमध्ये बसवून चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. सध्या मुलीची प्रकृती ठीक आहे.