लॉकडाऊनचं उल्लंघन; पोलिसांनी दिली तापलेल्या रस्त्यावर ‘मगर’ होण्याची भन्नाट शिक्षा

भन्नाट शिक्षेची सध्या सोशल मीडियावर होतेय चांगलीच चर्चा...

लॉकडाऊनचं उल्लंघन; पोलिसांनी दिली तापलेल्या रस्त्यावर 'मगर' होण्याची भन्नाट शिक्षा

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन असतानाही घराबाहेर विनाकारण पडणाऱ्यांना पोलीस वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा देताना दिसताय. बिहारच्या गोपालगंज येथे लॉकडाऊनचे उल्लंघन करून विनाकारण फिरायला आलेल्या लोकांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. नियम तोडणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी पोलिस आणि निमलष्करी दले वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करताना दिसताय. याच घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुरूवारी लॉकडाऊन दरम्यान ट्रक, कार आणि बाईकवर कारण नसताना रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पोलिसांनी उठा-बशा काढण्यास सांगितले. यासोबतच कडक उन्हाने तापलेल्या रस्त्यावर मगर होऊन सरपटत जायला देखील सांगितले असून अशा भन्नाट शिक्षेची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसतेय.

नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

पोलिसांनी दिलेल्या शिक्षेनुसार एक ट्रक ड्रायव्हर देखील कडक उन्हात रस्त्यावर झोपून मगरीसारखा पोहताना दिसला. यावेळी त्यांना घराबाहेर पडण्याचे कारण विचारत पोलिसांनी त्यांच्या काठीचा प्रसाद देखील त्यांना दिला. मिळालेल्या माहितीनुसार, ही भन्नाट शिक्षा पोलिसांनी गोपालगंज शहरातील आंबेडकर चौक या ठिकाणी दिली आहे. यावेळी पोलिसांनी काही लोकांना उठाबशा काढायला लावल्या तर काहीना कोंबडा बनण्यास सांगून त्यांची चांगलीच कानउघडणी केली. लॉकडाऊन काळात प्रशासनाकडून घरी सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येत असतानाही काही लोकं नियम तोडत असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.


LockDown: कर्नाटकमधील ‘या’ शाही विवाह सोहळ्यावर होती सरकारची नजर