घरट्रेंडिंगCorona Heroes: पंतप्रधान मोदींना 'या' ७४ वर्षीय आजोबांचा अभिमान! का ते जाणून...

Corona Heroes: पंतप्रधान मोदींना ‘या’ ७४ वर्षीय आजोबांचा अभिमान! का ते जाणून घ्या

Subscribe

सध्या देशातील अनेक लोक कोरोना व्हायरसच्या विरोधातील लढ्यात आपापल्या परीने भाग घेत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस आणि अत्यावश्यक सेवेतील इतर कर्मचारी या लढ्यात जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करत आहेत. मात्र याच्या व्यतिरिक्त अनेक व्यक्ती हे गरजू लोकांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. सध्या अशा एक व्यक्तीची चर्चा आहे. त्या ७४ वर्षांच्या व्यक्तीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील अभिमान आहे. त्यांनी या व्यक्तीबद्दल त्यांच्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरून ट्विट देखील केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करताना लिहिलं आहे की, ‘यांच्यासारख्या नागरिकांच्या अभिमान आहे. कोविड-१९च्या लढाईत ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.’ प्रसार भारती न्यूज सर्व्हिसेसचे ट्विट मोदींनी रिट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्या व्यक्तीबद्दल असं माहिती दिली आहे की, या वृद्ध व्यक्तीने आपल्या पेन्शनच्या पैशातून ६००० पेक्षा जास्त मास्क तयार करून ते गरजूंना मोफत वाटले आहेत. तसंच ते पेन्शनच्या रकमेतून गरजूंना मोफत अन्नाधान्याचं वाटपही करत आहेत.

- Advertisement -

या ७४ वर्षीय वृद्ध व्यक्तीचं नाव योग राज मेंगी असं आहे. सगळ्या नेटकऱ्यांनी या आजोबाच कौतुक केलं आहे. कोविड-१९ इंडिया ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात कोरोनाचे १३ हजार ६६३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४५० जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच १ हजार ७९३ कोरोनाचे रुग्ण रिकव्हर झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा  – राखी सावंतने शेअर केला नवऱ्यासह लग्नातला फोटो


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -