घरदेश-विदेश'ज्योतिरादित्य सिंदियांना काँग्रेस पक्षाध्यक्ष करा'; मध्य प्रदेशात पोस्टरबाजी

‘ज्योतिरादित्य सिंदियांना काँग्रेस पक्षाध्यक्ष करा’; मध्य प्रदेशात पोस्टरबाजी

Subscribe

मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाध्यक्ष पदावरुन पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्योतिरादित्य सिंदियांना पक्षाध्यक्ष करा, अशी विनंती केली आहे.

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांना पक्षाध्यक्ष करा, असा संदेश देणारे पोस्टर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात लावले आहे. हे पोस्टर भोपाल येथील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर लावण्यात आले आहे. या पोस्टरबाजीनंतर राहुल गांधी काय निर्णय घेतील? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. पक्षाध्यक्ष कोणाला करावे, यासाठी काँग्रेस कमिटीच्या वारंवार बैठकी होत आहेत. परंतु, अध्याप योग्य निर्णय झालेल्याचे समोर आलेले नाही.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसचा पक्षाध्यक्ष कोण होणार? यावर जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांना पक्षाध्यक्ष बनवा, असा संदेश देणारा पोश्टर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावला आहे. पक्षाध्यक्ष पदासाठी याअगोदर माजी केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव चर्चेत होते. त्यानंतर काँग्रेसच्या बऱ्याच ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत होते. पक्षाध्यक्ष पदाचा गांधी घराण्याशी काही संबंध नसावा, अशी इच्छा राहुल गांधी यांची आहे.

गेल्या आठवड्याभरापासून मोतीलाल वोरा यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. मात्र, त्यांनी स्वत: याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे काँग्रेसचा पक्षाध्यक्ष कोण होणार? यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ नये, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे होते. मात्र, तरीही लोकसभा निवडणुकीला नाराज झालेल्या राहुल गांधींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपचा मुख्यमंत्री निश्चित?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -