घरदेश-विदेशअबब...चार कोटींच्या कोंबड्या वाटल्या फुकट!!!

अबब…चार कोटींच्या कोंबड्या वाटल्या फुकट!!!

Subscribe

कर्नाटकच्या रायबाग येथील पोल्ट्री व्यावसायिक सदाशिव देशिंगे यांनी चक्क चार कोटी रुपये किंमतीच्या सुमारे २५ हजार जिवंत कोंबड्या फुकट वाट्ल्या आहेत.

तुम्ही जर चिकनप्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. मांसाहारी जेवण म्हटलं कि चिकन खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. साधारणतः चिकन २०० ते २५० रुपये प्रतिकिलो या भावाने विकले जाते. त्यामुळे मध्यमवर्गीयांना नेहमीच चिकन खाणे परवडत नाही. मात्र जर तुम्हाला अक्खी कोंबडीच फुकट मिळाली तर?  तेही जिवंत. विश्वास बसत नाही ना? मात्र प्रत्यक्षात असं झालंय ते कर्नाटकच्या रायबाग येथे. पोल्ट्री व्यावसायिक सदाशिव देशिंगे यांनी चक्क चार कोटी रुपये किंमतीच्या सुमारे २५ हजार जिवंत कोंबड्या फुकट वाट्ल्याचा दावा केलाय.

नेमकं काय झालं?

त्याचं झालं असं कि, करोना व्हायरसनं आता भारतातही शिरकाव केलाय. करोना व्हायरसची लागण प्राण्यांमधूनही माणसाला होऊ शकते असं बोललं जातं. पण सोशल मीडियावर अशी अफवा पसरली की, ज्याप्रमाणे स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू यांसारखे आजार पसरले होते, त्याचप्रमाणे करोना व्हायरस देखील कोंबड्यांमधून आला आहे किंवा चिकन खाल्ल्याने करोना व्हायरसची लागण होऊ शकते. मग काय, या अफवेने रातोरात चिकन खाणाऱ्यांची संख्या घटली आणि त्याची मागणीही घटली. परिणामी पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान होऊ लागले. दररोज लाखो कोंबड्याना लागणारे अन्न, पाणी, जागा इत्यादींचा खर्च परवडणारा नव्हता आणि त्यात मागणीही घटली. त्यामुळे काही पोल्ट्री व्यावसायिकांनी तर जिवंत कोंबड्या, अंडी यांची विल्हेवाट लावली. रायबागच्या सदाशिव देशिंगे यांच्यासोबतही असंच घडलं. मात्र त्यांनी त्या कोंबड्यांची विल्हेवाट न लावता स्थानिक लोकांमध्ये त्याचे वाटप केले.

- Advertisement -

कोटींचे नुकसान 

सदाशिव यांच्यानुसार त्यांचे अनके पोल्ट्रीफार्म्स आहेत. त्यामध्ये जवळपास दोन लाख पक्षी आहेत. अगळवाडी, रायबाग, भिर्डी, भेंडवाड, यमकनमर्डी या ठिकाणी त्यांचे पोल्ट्रीफार्म्स असून तेथे २०० कामगार काम करतात. मात्र करोना व्हायरसच्या प्रसारामुळे आणि अफवेमुळे उत्पन्न कमी झाले असून सदाशिव याना दर आठवड्याला ३५ ते ४० लाखांचे नुकसान होत आहे. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे ते सांगतात.

- Advertisement -

गावांमध्ये मोफत वाटप 

सदाशिव देशिंगे यांनी सांगितले कि, रायबाग, मेकळी, ऐनापूर, भेंडवाड, जलालपूर, भिर्डी यांसह वीस गावांमध्ये कोंबड्यांचे मोफत वाटप केले. त्यासाठी त्यांनी स्वतःची वाहने त्या-त्या गावात नेली. फुकट कोंबड्या मिळत असल्याची बातमी कळताच स्थानिकांनी एकाच गर्दी केली आणि अनेक कोंबड्या नेल्या.

चिकन दिल्याचे समाधान 

करोनामुळे पक्षांचे दर घरून ८ रुपयांपर्यंत आले होते. त्यामुळे कमीत कमी किंमतीत विकण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांमध्ये त्याचे वाटप करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. माझे मोठे नुकसान झाले असले तरी सर्वसामान्य लोकांना चिकन दिल्याचे समाधान आहे असे ते म्हणतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -