CoronaVirus: आता घरी बसून पुन्हा पाहा ‘रामायण’

उद्यापासून दूरदर्शनवर रामायण ही मालिका प्रसारित होणार आहे.

prakash javadekar announced ramayana will telecast from march 28 on dd national
CoronaVirus: आता घरी बसून पुन्हा पाहा 'रामायण'

करोनाचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जारी केला. हा लॉकडाऊन २१ दिवसांचा असून १४ एप्रिलपर्यंत सुरू असणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरी बसण्याचे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने देखील आवाहन केलं आहे. पण इतका वेळ घरी बसू करायचं काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र आता घरी बसून तुम्ही दूरदर्शनवरील अनेकांची मने जिंकलेली ‘रामायण’ मालिका पुन्हा पाहायला मिळणार आहे. उद्यापासून तुम्ही घरात बसून दूरदर्शनवर रामायण पाहू शकणार आहात. याबाबत माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडे माहिती दिली आहे.

नागरिकांना मागणीनुसार उद्यापासून रामायण मालिका दूरदर्शन दाखवण्यात येणार आहे. पहिला एपिसोड हा सकाळी ९ वाजता आणि दुसरा एपिसोड रात्री ९ वाजता दाखवण्यात येणार आहे.


हेही वाचा – CoronaVirus: दाक्षिणात्य अभिनेते मदतीसाठी पुढे; पण बॉलिवूड कुठेय?