घरदेश-विदेशप्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री निश्चित?

प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री निश्चित?

Subscribe

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मृत्यूनंतर गोव्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रमोद सावंत हे गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निश्चित झाले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री कुणाला करायचे? हा यक्षप्रश्न भाजपला पडला होता. गेल्या वर्षभरापासून भाजप मुख्यमंत्रीपदासाठी नवीन चेहरा शोधत होते. परंतु, भाजपला यात अपयश आले. त्यामुळे पर्रिकरस यांच्या निधनानंतर भाजप मोठी तारांबळ उडाली. या दरम्यान काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला. याच पार्श्वभूमीवर नितीन गडकरी काल मध्यरात्रीपासून गोव्यात दाखल झाले होते. अखेर मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद सावंत यांना गोव्याच्या नव्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आले आहे.

कोण आहेत प्रमोद सावंत?

प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते व्यावसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. मनोहर पर्रिकर यांच्या मृत्यूनंतर प्रमोद सावंत यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अग्रस्थानी होते. यादरम्यान नितीन गडकरी यांची मित्रपक्षांशी चर्चा झाली. नितीन गडकरी यांनी काल रात्री गोवा फॉरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई आणि एमजीपीच्या सुधीन ढवळीकर यांच्याशी जवळपास दोन तास चर्चा केली. या सर्व चर्चांनंतर अखेर प्रमोद सावंत यांच्या नावावर शिख्खामार्तोब करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. प्रमोद सावंत यांच्यासोबतच विश्वजीत राणे, श्रीपाद नाईक यांचेदेखील नाव आघाडीवर होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -