घरदेश-विदेशBreaking : गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत; रात्री ११ वाजता होणार शपथविधी

Breaking : गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत; रात्री ११ वाजता होणार शपथविधी

Subscribe

अखेर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला असून भाजपचे प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

अखेर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला असून भाजपचे प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाल्यानंतर राज्याची धुरा कोणाच्या हातात जाणार यावरून बरेच राजकारण आज, सोमवारी दिवसभर सुरु होते. अखेर प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून आज रात्री ११ च्या सुमारास ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई या दोघा आमदारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास भारतीय जनता पक्ष तयार झाला आहे. घटक पक्ष त्यामुळे सावंत यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार झाला आहे.

कोण आहेत प्रमोद सावंत

प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेचे सभापती असून तर व्यवसायाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. विद्यमान गोवा विधानसभा भाजप आमदारांमधील पर्रिकरांनंतर आरएसएस केडरचे एकमेव आमदार आहेत. प्रमोद सावंत हे दोनवेळा साखळी मतदारसंघातून निवडून आले. काँग्रेसमधून जे नेते गेल्या वर्षभरात भाजपमध्ये आले, त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही असे भाजपने ठरवले होते. प्रमोद सावंत हे भाजप पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. सावंत हे मार्च २०१७ पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधी मंत्री झाले नव्हते. मात्र त्यांना आता थेट मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळणार आहे. मगोप आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही घटक पक्षांनी उपमुख्यमंत्रीपद मागितले होते. ते देण्यास भाजप बऱ्याच चर्चेनंतर तयार झाला. मगोपकडे तीन आमदार असून त्या तिघांनाही नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल. गोवा फॉरवर्डच्याही तिघा आमदारांना मंत्रीपद मिळेल, असे भाजपच्या उच्चस्तरीय सुत्रंनी सांगितले. पर्रीकर सरकारमध्ये मगोपचे फक्त दोघेच मंत्री होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -