घरदेश-विदेश'या' निर्णयानं पर्रीकरांनी वाचवले ४९ हजार कोटी

‘या’ निर्णयानं पर्रीकरांनी वाचवले ४९ हजार कोटी

Subscribe

एका निर्णयानंतर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी देशाची पुढील दशकभरासाठी जवळपास ४९ हजार ३०० कोटी रुपयांची बचत केली आहे.

देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे नाव नेहमीच आदराने घेतलं जातं. पर्रीकरांबद्दल जनतेच्या मनात फार आदर आहे. आतापर्यंत तीन वेळा ते गोवा राज्याचे मुख्यमंत्री बनले होते. तसेच संरक्षण मंत्री असताना मनोहर पर्रीकर यांनी जे करुन दाखवले ते खूप कमी जणांना साध्य झाले आहे. हवाई संरक्षण यंत्रणेच्या खरेदी करारावेळी त्यांनी हस्तक्षप केल्याने हवाई सुरक्षा योजनेत बदल करण्यात आले. त्यांच्या एका निर्णयामुळे देशाची पुढील दशकभरासाठी जवळपास ४९ हजार ३०० कोटी रुपयांची बचत झाली आहे.

एस ४०० या क्षेपणास्त्रांच्या यंत्रणेत हस्तक्षेप

‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, रशियाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या एस ४०० या क्षेपणास्त्रांच्या प्रचंड किंमती लक्षात घेऊन माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी २०२७ पर्यंत हवाई सुरक्षा यंत्रणांच्या खरेदीसाठी १५ वर्षांच्या ‘टर्म प्लान’चा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानंतर त्यानुसार आढावा घेण्यात आला. या आढाव्यानुसार, हवाई दलांने तांत्रिक अभ्यास केला. त्याचप्रमाणे जगभरातील उपलब्ध सर्व हवाई सुरक्षा यंत्रणांचेही मूल्यांकन केले गेले. या आढावा प्रक्रियेदरम्यान कमी अंतराच्या हवाई सुरक्षा यंत्रणांच्या खरेदीत घट करण्यावर सर्वांचे एकमत झाले असल्याची माहिती काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिली.

- Advertisement -

वाचा – जाणून घ्या, कसे होते मनोहर पर्रिकर

वाचा – तर मी राजकारण सोडून दिलं असतं – मनोहर पर्रिकर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -